प्रसिद्ध लेखक, वरिष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांच्या ६ नर्मविनोदी कथांचा संग्रह प्रथम ईबुक स्वरूपात... ‘भोलानाथ बैसले कैलासावरी...’ या कथेमध्ये एकदा क्षुल्लक कारणावरून वाद घडल्यामुळे गोपाळरावांची पत्नी राधा, काही न सांगता घर सोडून निघून जाते. तिला शोधताना गोपाळरावांची पुरती तारांबळ उडते. शेवटी ते एक शक्कल लढवतात आणि तीच त्यांच्या अंगलट येते... ‘चौदावं रत्न पुरस्कार’ या कथेत चार मित्रांना ‘फेमस’ व्हायचं असतं. त्यासाठी ते वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्तींना पुरस्कार द्यायचा घाट घालतात. प्रसारमाध्यमांत तशी प्रसिद्धी करतात. तेव्हा त्यांना कळतं की, घेण्यापेक्षा पुरस्कार देणं हाच एक मोठा व्यवसाय आहे...! ‘क्ष क्षुल्लकाची ब्लॅक कॉमेडी’ या कथेत क्ष हे पात्र चित