‘आम्ही भगीरथाचे पुत्र’ ही गोनीदांची अगदी वेगळी कादंबरी. अर्धशतकापूर्वी भाकडा-नंगल धरण प्रकल्पावर लिहिलेली. मराठी साहित्यविश्वात अपवादात्मक म्हणावी अशी. गोनीदांना जसे जुन्याचे आकर्षण तसे नव्याविषयी कुतूहल. नवनिर्माणाविषयी आंतरिक ओढ. साहजिकच भाकडा-नंगल धरण प्रकल्प हा त्यांना कादंबरीचा विषय वाटला. सत्य आणि कल्पिताचा सुरेख संगम साधून कादंबरी लिहिता येईल हे त्यांच्या प्रतिभेला जाणवलं. त्यांच्या नवनिर्माणाच्या कुतुहलामागे होतं, त्यांचं भारतीय संस्कृतीविषयीचं प्रेम. हिमालयाच्या त्या भागातील माणसांचं भावजीवन त्यांनी जाणून घेतलं. त्यांच्या परंपरा, त्यांच्या रीतीभाती, त्यांची श्रद्धास्थानं, त्यांच्या अस्मिता असं सगळं अनुभवलं.
G.N. Dandekar, (Devnagari: गो.नी. दांडेकर ) popoularly known as "Go.ni da" in marathi literature is one of the prominent writer of historical fictions & some real good biographical novels, Most of his books are also good travelogues including trekking data detailing almost minute information about the place & history associated with it.
He was honoured with a D.Litt degree by university of Pune.
गोनीदांच्या खास शैलीत लिहिलेली कादंबरी. पण वाचताना ती कादंबरी न राहता वास्तव असल्यासारखे वाटायला लागते. प्रत्येक व्यक्तिरेखेच्या भावनांसोबत आपलाही प्रवास होऊ लागतो.. आणि शेवटी भाकरानांगल साकारते त्येवेळेस अश्रू, अभिमान, देशप्रेम, दुःख अशा सर्व भावनांमध्ये आपण हेलकावे खात राहतो... खूपच छान कादंबरी!