Jump to ratings and reviews
Rate this book

वेटिंग आहे राव! : Waiting Aahe Rao!

Rate this book
बघायचा कार्यक्रम काय घरातच, कांदेपोहे खातच, ठरलेले प्रश्न विचारतच व्हायला हवा का? नाही... असंच काही नाही... पण मग...? अवलिया गब्रूनं हल्लीच्या पिढीला साजेशी अशी मुली बघायची नव्हे 'बघायचा कार्यक्रम' करण्यासाठीची खवय्येगिरीसारखी 'पाक'कला चोखाळली... वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये, रेसटॉरंट्समध्ये जाऊन तिथल्या स्पेशल डिशेस खात मुलींना भेटलं, त्यांच्याशी गप्पा मारल्या तर एखादी 'टवका' हाती लागतीय का याचा पुरेपूर प्रयत्न गब्रूनं केला नि त्याच्या लक्षात आलं की, लग्न करणं ही काय खायची गोष्ट नाहीये... त्याकरता वेटिंग आहे राव...

209 pages, Kindle Edition

Published June 30, 2020

2 people are currently reading
23 people want to read

About the author

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
48 (73%)
4 stars
10 (15%)
3 stars
5 (7%)
2 stars
1 (1%)
1 star
1 (1%)
Displaying 1 - 24 of 24 reviews
1 review
Read
September 12, 2020
माझ मन मला सतत सांगत हाेत काहीतरी नवीन वाचायला हवंय,तेचतेच नकाेय मला,म्हणून मग मी वेगळ वाचल खरंतर पण त्याच काही समाधान झालं नाही आणि मग काय अॅमेझाॅन वरून रसिक साहित्य ने प्रकाशित केलेल 'द स्वागत पाटणकर' यांच 'वेटिंग आहे राव' या पुस्तकाच जास्त वेटिंग न करता अखेर आगमन झालं.
तर, अनेक दिवसांनी मला अतिशय फ्रेश पुस्तक वाचायला मिळाल.मंडईतून आणलेल्या ताज्या भाज्या आणि त्यापासून केलेली एखादी नव्या चवीची भाजी किती चमचमीत लागेल तसंच हे पुस्तक वाचताना मला जाणवलं.
थाेडासा सविस्तर वाटेल हा अभिप्राय पण हे लिहीलय इतक कमाल त्यामुळे 'येताे बनताही है'!!
'वेटिंग आहे राव' ह्यात स्वागत पाटणकरांनी जाेरदार बॅटिंग केलीये ह्यात शंकाच नाही.साध,सरळ साेप,सुटसुटीत असं लिहिण साेप नसत असं म्हणतात,पण स्वागत ह्यांनी ते काम चाेख पणे निभावल आहे.जसं की 'चविष्ट संस्कार किंवा ,'मुलाचे पाय दर्शनमध्ये दिसतात', 'फायनली गुडलक' ही त्यातल्या कथांना दिलेली अर्थपूर्ण नाव!! मी असं का म्हणतीये हे पूर्ण पुस्तक वाचल्यावर कळेलच.
प्रत्येक पानावर वेगळ्या चवीच कधी आंबट,कधी झणझणीत तर कधी गाेड चवी चाखायला आय मीन टू से वाचायला मिळतील आणि हाे ह्याच अपचन न हाेता सगळं रूचकरच आहे ह्याची नाेंद घ्यावी.😁
पुण्यातली लाेक स्वत:ला ग्रेट समजतात असं नाहीये तर खरंचच ती ग्रेट असतात ते कसं तर 'वेटिंग आहे राव' वाचल्यावर लगेचच कळत.अनेक वर्षांत पुण्याच्या खाद्यसंस्कृतीत चांगलेच बदल झालेत ते सकारात्मक आणि अत्यंत चविष्ट पद्धतीने स्वागत उर्फ गबरू ह्यांनी उत्तमरित्या मांडलेले दिसून येतात, निरनिराळ्या पदार्थांची चव त्याअनुशंगाने त्याची मांडणीही जितकी महत्त्वाची आणि आकर्षक असण आवश्यक असतं अगदी त्याचप्रमाणे या पुस्तकाची मांडणी आहे.
प्रत्येक कथांमधल्या जागा ह्या केवळ जागा नव्हेत तर त्या भावना आहेत हे पूर्णपणे पटतं.केवळ पुणेकरच नाहीत तर वेगळ्या शहरांमधली लाेक ज्यांना त्या जागा माहिती नसूनसुद्धा त्याच्याशी कनेक्ट हाेऊ शकतात इतकी ताकद त्या शब्दांध्ये,भावनांमध्ये तसंच पुण्यातल्या हॉटेल्समध्ये पण आहे😉
गबरूने त्याची प्रेमकथापण रंजकपणे त्यात गुंफलीये त्यामुळे वाचायला फारच मस्त वाटतं.आधी मी एकाच दिवसात वाचणार हे पक्क केल हाेत. अहाे, पण प्रत्येक हॉटेलमध्ये एकाचवेळी आणि तेही 'वेंटिग' असताना कसं जाणार त्यामुळे निवांतपणे वाचल.
अशा त-हेने 'वेटिंग आहे राव' वाचायलाच हवं असं जर तुम्हाला वाटतय अर्थातच वाटत असणार म्हणा,अहाे मग वाट कसली पाहताय अॅमेझाॅन वर तुम्हाला ई-बुक,त्याची प्रिंट कॉपी असे पर्याय उपलब्ध आहेत.तसंच रसिक साहित्यची लिंक खाली देतीये लगेचच जा आणि मेनूकार्ड सर्च करा व आपली आॅर्डर म्हणजे आपल पुस्तक 'वेटिंग आहे राव' बुक करा,वाचा त्याचा पुरेपूर आस्वाद घ्या मन आणि पाेट तृप्त हाेईल याची लेखकाने पूर्णत: काळजी घेतलेली आहे.

पुस्तकांच्या आवृत्तीचं 'वेटिंग' सुरू हाेवाे ह्या शुभेच्छा!!
‌‌‌‌ ‌ ‌‌ -गाैतमी करमरकर

1 review
August 7, 2020
गबरुचं मेन्यू कार्ड

बरेच दिवस झालेले पुस्तक विकत घेऊन पण वाचायचा मुहूर्त काही लागत नव्हता! ऑफीसच्या कामांमुळे "लै वेटिंग वर होतं राव" हे काम!
हो! कामच! उगाच पुस्तक उघडलंय आणि टाईमपास म्हणून वाचायला घेतलंय किंवा "लॉकडाऊनच्या काळात तुम्ही कुठलं पुस्तक वाचलं?" अश्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी नव्हतं वाचायचं. लक्ष देऊन प्रत्येक पानाची चव घेत वाचायचं होतं! विषयच जिव्हाळ्याचा! "आपण" किती फूडी आहोत सगळ्यांना माहितीये आणि गबरुने पुस्तक पण त्याच विषयावर लिहिलंय! का नाही वाचणार मग!
असं म्हणतात की लेख/पुस्तक वगैरे लिहायला मुळात स्वतःचं वाचन वगैरे हवं... असेलही खरं पण पुस्तक वाचायला घेतलं आणि "मनोगत" मध्येच पहिला सिक्सर लागला... “आपली जीभसुद्धा कसली वेडसर असते... नाही? आपल्याला वाटतं ती चवीने खातीये... पण ती तर चविष्ट आठवणी तयार करत असते... आयुष्यभर पुरतील अशा.” हे ते सिक्सरचं वाक्य! आता मला सांगा हे इतकं साधं पण परफेक्ट वाक्य लिहायला कशाला हवाय वाचनाचा व्यासंग वगैरे! वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळं खायची आवड असली की झालं!
असो... अताशा पहिला चॅप्टर वाचून झालाय... पुस्तक वाचतानासुद्धा तोंडाला पाणी सुटू शकतं हे आज कळतंय! एक एक प्रसंग वाचताना समोर स्क्रीन प्ले सुरू होता मग ते उपम्यवार लिंबू पिळून कुरकुरीत शेव टाकणं असेल, पॅटीसचा चुरा काळ्या हाफ चड्डीवरून झटकणं असेल, चहात बुडालेलं बिस्कीट वर काढण्याचा अयशस्वी प्रयत्न, क्रिकेटच्या मॅचमध्ये स्वागतने मारलेल्या फोर्स, पाटील काकांचा फ्रेंच बिअर्ड लूक, आलं घातलेला वाफाळलेला चहा आणि "आवारे मराठा खानावळ". इथल्या चिकन थाळीचं "प्रेझेंटेशन" जे काय मांडलंय भावानं ते तर चुम्मेश्वरी! गबरु खानावळीत जेवायला गेलेला तेव्हा जन्म पण नसेल झाला माझा किंवा नुकताच जन्मलो असेन पण हा पठ्ठ्या "तू वर्षानुवर्षे पुण्यातच राहतोयंस" असं भासवून गेला या सगळ्यात! फुल्ल "हरितात्या" टाईप फिलिंग आलेलं मला हे वाचल्यावर!
लिहिल्याप्रमाणे पहिला चॅप्टर वाचलाय आत्ता फक्त! शक्यतो जरा जास्तीच उदरम् भरणम् करून मगच चाखायला बसा हे पुस्तक! खूप काही फरक पडेल असं नाही पण मनाला/पोटाला/मेंदूला एक बालिश दिलासा! नंतर आपण बोलायला मोकळं "तुला गरज होती म्हणून मी परत खातोय... मला गरज नाहीये!" जे सापडेल ते खाणार आता...

टीप - लिहायला लिहिलंय मी की "वाचलं" वगैरे पण हे पुस्तक वाचायला नसून "खायला" आहे. बाकी काय म्हणता? J1 झालं का?
1 review
Read
July 13, 2020
वेटिंग आहे राव!

"तूला e book वाचायला आवडत नसेल तर मी book ची copy पाठवीन"
माइया congratulatory message ला स्वागत नी असा reply केला,खूप भारी वाटलं पण मी अस्वस्थ ही झाले. आपल्या मित्रानी एवढं book वगैरे लिहिलय आणि आपण अजून ते वाचायला पण घेतलं नाही हे पटत नव्हतं. IT professional असल्यामुळे दिवसभर laptop मध्ये डोकं घालून बसावं लागतं, आता पुस्तक पण online वाचायचं ? खरं सांगायचं तर जरा कंटाळाच केला. पण Facebook वरचे reviews स्वस्थ बसू देत नव्हते. शेवटी 'No more waiting' असं म्हणून Amazon वरून e book download केलं. उशीरा का होईना पण आपण किती भारी काम केलंय हे पहिल्यां 2 पानातच लक्षात आलं.
सुरुवातीलाच आवारे मराठा ची चिकन थाळी appetizer म्हणून समोर आली आणि माझी भूक अजून च वाढली.
मग त्या नंतर नात्यांचे आणि भावनांचे स्वाद कधी सुजाता मस्तानी च्या गोडव्यातून, तर कधी दिल्ली स्वाद च्या सामोश्यांचा चटपटीत पणातून समोर आले. स्वागत नी ते इतके सुंदर पद्धतीनी मांडले आहेत की सगळ्या चवी आपोआप जीभेवर रेंगाळायला लागतात!
दर्शन, कपिला, तिरंगा, वैशाली पासून ते Le Plaisir, Barometer पर्यंत चे पुण्यानी बघितलेले बदल हे गबरु मुळे परत अनुभवायला मिळाले आणि मी कुठली ठिकाणं miss केली आहेत हेही कळलं!
आता next time स्वागत पुण्यात आला की या पैकी च एका ठिकाणी celebration नक्की.
शेवटी पुस्तक लिहिणं ही काही 'खायची' गोष्ट नाही !

Gauri Bhat
1 review
August 16, 2020
Last evening I heard Sudha Murthy ji speak in an interview; she spoke about collating from the X & Y axis when she writes, the Y representing the imaginary and the X drawing from real life experiences. & that exactly is what you’ve brilliantly done with this book Swagat. Couldn’t differentiate between Gabru & you, you merged the two so well that it gave me a feeling of sitting across a table for long hours at Barista on Law College Rd, Pune, over a cup of coffee and having a conversation with you. Partially also the reason why I am utterly confused whether I should review ‘You’ the writer, ‘Gabru’ the protagonist or the ‘Mouthwatering Content’!

Since I have spoken about you already let me move onto the other two -
Gabru, to me, felt like the youngest eligible bachelor from my own family. Whacked out yet loving in so many ways! & as for the content of the book, I will have to write it in Marathi, “शब्दांची चव घेत घेत वाचलेलं हे पहिलंच पुस्तक”

Congratulations on your superhit debut Patankar & best wishes for many more to come ... will eagerly look forward to the next one ♥️

#waitingaaherao #bookreview #goodreads
Profile Image for Gaurav Kulkarni.
3 reviews
July 29, 2020
अप्रतिम लेखन शैली!! खाण्याची आवड असेल आणि त्यात जर पुणेकर असाल तर हे पुस्तक वाचणं तुमच्यासाठी MUST आहे.

गबरू च्या आवडत्या हॉटेल्स मधल्या एका एका पदार्थांचा वर्णन ऐकताना आपल्यालाच सडकून भूक लागते. आज पर्यंत अनेक dishes ची वर्णन वाचली आणि ऐकली पण त्या इतक्या कुशलतेने मांडलेली पहिल्यांदांच पहिली! माझ्यासारख्या पुण्या बाहेरच्या माणसाला सुद्धा तो पदार्थ जणू समोरच्या डिश मध्ये ठेवला आहे इतक्या क्लिअर डोळ्यासमोर दिसला. देशा बाहेर राहून पुण्याच्या खाद्य संस्कृतीची सफर घडवून आणल्या बद्दल स्वागत चे खूप धन्यवाद

वेगवेगळ्या खायच्या जागा आणि तिथल्या पदार्थांशी ओळख करून देताना कधी गबरू चा लग्न हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय होऊन जातो हे लक्षातच येत नाही. उनाड आणि अल्लड ते MATURE हा गबरुचं प्रवास अतिशय हलक्या फुलक्या शैलीत ज्या प्रकारे स्वागत ने रचला आहे त्या बद्दल हॅट्स ऑफ!

ता.क. हे पुस्तक वाचायला घ्यायच्या आधी भरपेट जेऊन घ्या! नंतर तक्रारी करण्यात काहीही अर्थ नाही!
Profile Image for Abhijeet.
1 review1 follower
July 22, 2020
A brilliant read. It's fast paced and keeps you engaged throughout. The author is as funny as he is witty, and this book seems to be his ode to the city of Pune. He has managed to capture the essence of Pune (not Poona) with mere words. Anyone who has lived in Pune will surely reminiscent their time spent in & around the lovely restaurants & eateries. The love story will remind you of your first love, it seems as if the author is writing from his personal experience. I won't be surprised if this book goes on to become a cult classic, and is made into a movie someday.

In short, highly recommend.
1 review
July 12, 2020
ताजतवान ...नी खुसखुशीत पुस्तक ....
गबरु ची खवैयेगिरी..पुण्यातल्या काल ..आज आणि उद्याच्या खाण्याच्या वेगवेगळ्या जागांच रसभरीत वर्णन..त्यात अरेंज marrige chya process che kadhi गमतीशीर कधी वैताग आणणारे अनुभव ...आणि त्यातच अलवार गुंफलेली प्रेमकथा सगळ छानच जमून आलाय ...

खवैयांसाठी तर मस्ट रीड आहेच... पण arrange marrige chya process मधून गेलेल्या ..जाऊ घातलेल्या .. न गेलेल्या प्रत्येकाने वाचावे असे खुसखुशीत पुस्तक ..
lockdown chya काळात एकदम रिफ्रेश करणार .. पुण्यातल्या गल्ली बोळतल्या टपऱ्या खानावळी हॉटेल्स मधल्या जुन्या आठवणीत मित्र मैत्रिणीनं बरोबर रमवणार मस्त पुस्तक...
1 review
Read
July 16, 2020
लै भारी पुस्तक!

पुण्यातल्या अनेक रेस्टॉरंटची माहिती स्वागतने अत्यंत चविष्ट आठवणींच्या रुपात मांडली आहे. पुस्तक लिहिणं सोपी गोष्ट नाही ती त्याने उत्तमरित्या पेलली आहे़. थोडक्यात सांगायचं झालं तर सुजाता मस्तानीतल्या Mango milkshake पासून ते बारोमीटर मधल्या Pasta पर्यंत चमचमीत, खुसखुशीत आणि तोंडाला पाणी सुटणार्‍या पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर हे पुस्तक नक्की वाचा.

तुझ्या विनोदी शैलीमुळे पुस्तक वाचायला मजा आली.
1 review1 follower
August 6, 2020
Swagat Patankar लई भारी लिहिलंयस मित्रा. खूप मजा आली वाचताना. एकेका ठिकाणच्या डिशेस आठवून तोंडाला पाणी पण सुटलं. पण Lock down मुळे सगळी आवडती ठिकाणं बंद असल्यामुळे चिडचिड झाली. कारण ह्या सर्व ठिकाणांची speciality फक्त फूड नसून तिथला माहौल आहे. Especially शबरी आणि कवी चा माहौल आठवून तर विशेष चिडचिड झाली. असो.

पण फार लवकर लग्न लागलं तुझं. अजून थोडं थांबला असतास तर आम्हाला अजून काही चाखायला मिळालं असतं. जाऊदे. तरी बघ अजून एखादं लग्न करायचा विचार कर.😜

वाट बघतोय पुढच्या लग्नाची... 👍
1 review
July 20, 2020
माझं love marriage झाल्याने कांदा पोहे आणि मुली पाहणे त्यांना भेटणे या गोष्टींना मी किती मिस केलंय ते स्वागत चे waiting aahe rao हे पुस्तक वाचवल्यावर जाणवलं. त्यातून पुण्यातील विविध खाण्याच्या ठिकाणांची गंमत आणि त्या आठवणी सांगून एक वेगळाच तडका दिलाय स्वागत ने.वाचलं नसेल तर जरूर वाचा waiting aahe rao. Download करायला waiting करू नका. Available on Amazon Kindle.
1 review
July 14, 2020
I have known the author of this book since I was a small child and looking at him achieve this milestone is a moment of pride and inspiration for me. Not one to have a biased opinion, all Marathi readers would definitely enjoy this one. Cheers!
1 review
July 1, 2020
Made me nostalgic....... and hungry :) nice humor .. refreshing and must read for all foodies here.
1 review
July 9, 2020
Loved it... bhuk lagli vachun! must read!

ek sitting madhe sampavla pustak! j
Profile Image for Hersh.
1 review
July 10, 2020
Superb read. A gastronomic guide to Pune. Read before you visit.
1 review
July 11, 2020
मस्त हलकंफुलकं लेखन!!
Profile Image for Wishwas.
18 reviews1 follower
January 11, 2026
खुमासदार आणि खुसखुशीत! एक चवीष्ट थाळी! नक्की वाचा! 😉
1 review
July 9, 2020
EKkkkkkkkkk number pustak... sopi bhasha... must read..loved the way of writing... all d best!
Profile Image for Kaustubh.
18 reviews
August 9, 2020
आवारे मराठा, बादशाही, दर्शन, बिपिन, ले पलासिर, वैशाली, रुपाली, गूडलक, तिरंगा, SP's आणि अजून बऱ्याच पुण्यातल्या iconic eateries ची सफर घडवत त्याबरोबर बदललेले पुणे आणि मराठी लग्न संस्कार याची एक rollercoaster राईड  खाण्यासाठीच जगणाऱ्यानी वाचलेच पाहिजे.. जर तुमच्या आयुष्यातील काही आठवणी पुण्याशी निगडित असतील तर हे पुस्तक नक्कीच त्या आठवणींना फुंकर घालेल.. एकदम हलकं फुलकं वाचकांना खिळवून ठेवणारं लिखाण..
Profile Image for Rashmi Gangal.
1 review3 followers
October 3, 2020
फेसबुक पोस्ट वर आलेला गौरी केळकर चा एक रिव्हह्यू

-----

कधीतरी भेटल्यावर तो चितळ्यांची आंबा बर्फी देईल या आशेने मी स्वागतच 'वेटींग आहे राव' वाचायला घेतलं...आणि एका बैठकीत वाचून पूर्ण केलं! आजकाल binge watch करण्याच्या जमान्यात खूप दिवसांनी binge read केलं!! पुस्तकातल्या खाण्याच्या वर्णनाबरोबर आठवणींचे हिशोब लागत गेले आणि त्यातली माझी गुंतवणूक वाढत गेली. पुस्तकात वर्णन केलेल्या ९०% जागा अगदी ओळखीच्या आणि आज्जीच्या हातच्या कैरीच्या लोणाच्यासारख्या मस्तपैकी मनात मुरलेल्या!! त्यांच्याशी कधी कशी ओळख झाली या अनुभवात फरक असेल पण त्यांची आठवण मात्र सेम टू सेम!!
उकडीच्या मोदकांची चव कशी गणपती गावाला गेले तरी जिभेवर रेंगाळत राहते अगदी तस हे पुस्तक मनात रेंगाळत!!!

(तुम्ही जर खूप वर्षात पुण्यात गेला नसाल तर माझ्यासारखं एका बैठकीत वाचून काढू नका.. खूप म्हणजे खूप भूक लागते..)

Swagat Patankar अशीच चविष्ट पुस्तकं लिहीत रहा!

Check this out: वेटिंग आहे राव! : Waiting Aahe Rao! (Marathi Edition) by स्वागत ... https://www.amazon.in/dp/B08C57HF81/r...
Profile Image for Aditya Sathe.
Author 3 books8 followers
October 25, 2021
काय वेटींग होतं राव!

पुणे, खाणे आणि प्रेम हा सुवर्ण त्रिकोण जिथे जुळला तिथे काहीच चूक घडू शकत नाही! अफलातून आहे हे पुस्तक, अक्षरशः एका बैठकीत संपवलं, अगदी, मुखपृष्ठ ते मलपृष्ठ... आणि वेटींग संपलं राव!...
Displaying 1 - 24 of 24 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.