एका सामान्य रशियन ज्यू कुटुंबातील मुलगी कुटुंबासमवेत अमेरिकेला स्थलांतर करते, किशोर वयातच ती ज्यूंसाठी स्वतंत्र भूमी हवी, या विचाराने झपाटली जाते। त्या साठी ऐन विशीतच आपल्या पतीसमवेत ती अमेरिका सोडते। किबुत्झमध्ये राहून कुक्कुट पालनाचे धडे घेते, प्रसंगी बालवाडीतील मुलांचे कपडे धुऊन घरखर्च भागवते। राष्ट्र उभारणीच्या ध्येयाने प्रेरित होऊन, राजकारणात प्रवेश करते। अल्पावधीतच ती आपल्या कणखर वृत्तीनं फटकळ स्पष्टवक्तेपणानं, साध्या राहणीनं आणि सहज वणीनं आपला स्वतंत्र ठसा उमटवते, इस्रायलच्या स्वातंत्र्याच्या जाहिरनाम्यावर स्वाक्षरी करणारी ती एकमेव स्त्री। वयाची सत्तरी उलटल्यावर ती पंतप्रधान होते। आंतराष्ट्रीय पातळीवर धाडसी निर्णय घेऊन ते तडीस नेते। प्रखर
Former librarian and an avid reader, Veena Gavankar wrote Ek Hota Carver, her debut novel and biography of American agriculturist George Washington Carver in the year 1979.
She soon followed up with numerous other books, including Dr.Khankohje, Rozelind Franklin and Lise Mitner. Other books include Bhagirathe Varas, Dr.Ida Skadder and Sarptadnya Dr. Remond Ditmars.
Known for her simplistic, clear and precise writing style, Veena Gavankar’s numerous biographies have been inspirations for readers world over
अतिशय प्रवाही भाषेत लिहिलेलं चरित्र आहे. Israel निर्मितीचा सगळा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो. Golda Meir या करारी स्त्रीचा जीवनपट डोळ्यांसमोर उभा राहतो. तिने उपसलेले कष्ट, आपल्या ध्येयाकरता वैयक्तिक जीवनात केलेले असंख्य त्याग, स्वीकारलेलं साधं आणि कठोर जीवन, स्वतःच्या तब्येतीची काळजी नं करता सतत कार्यमग्न असण्याची तिची जिद्द हे सगळं खूप प्रेरणादायी आहे. प्रत्येकाने वाचावं असं चरित्र आहे. मराठी मध्ये हे चरित्र लिहिल्याबद्दल वीणा ताई गवाणकर यांचे खूप आभार.
Kindle version मध्ये असंख्य चूका आहेत, अनेक शब्द चूकीचे आहेत. कृपया आवश्यक त्या सुधारणा कराव्यात.
कोणी नेता असाही होऊन गेला याचं आश्चर्य वाटतं. एखाद्या देशाच्या जन्माची सुद्धा ही कथा आहे. अर्थात दुसऱ्या देशांच्या बाजूने सुद्धा वाचन करावे लागेल. हे पुस्तक वाचून शक्य तितक्या देशांच्या जन्माची कथा किंवा महान व्यक्तींची कथा वाचण्याचा प्रयत्न करता येईल का किंवा शालेय इतिहासात अशा देशांचा इतिहास समाविष्ट करता येईल का याचा विचार शिक्षण क्षेत्राने जरूर करावा. गोल्डा आणि वीणा गवाणकर या दोघींचे मनापासून कौतुक नि आभार. एक लेखक म्हणून पुढे असं काहीतरी लिहिता येईल का याचा विचार सुरु झाला आहे.
तुम्ही इस्राइलला माना अगर मानू नका, पण त्यांना दुर्लक्षित मात्र करता येणे जगात कोणालाही शक्य नाही. आणि या राष्ट्राच्या निर्मितीत ज्या एका रणरागिणी स्त्रीचा मोठ्ठा वाटा आहे अशा गो मेयर यांचं हे फार उत्तम चरित्र आहे. अगदी संयत, कोणालाही झुकते माप न देता लिहिलेलं. वीणा गवाणकर या "एक होता कार्व्हर" साठी खूप प्रसिद्ध आहेत पण या चरित्रात सुद्धा त्यांचा अभ्यास आणि चरित्र लिखाणासाठी लागणारी जिद्द दिसून येते. हे चरित्र क्वचित कुठेसे रुक्ष होते पण कदाचित यात दिसून येणार राजकारण त्याला कारणीभूत असू शकेल.
एकूण अनुभव भारावून टाकणारा होता त्यामुळे, जेव्हा संधी मिळेल तेव्हा हे नक्की वाचलेच पाहिजे असं चरित्र आहे.
"गोल्डा – एक अशांत वादळ" हे पुस्तक म्हणजे एका स्त्रीच्या धगधगत्या जीवनाचा जिवंत दस्तऐवज आहे. गवाणकरांनी गोल्डा मेयर यांच्या जीवनातील संघर्ष, त्याग आणि नेतृत्वगुण यांचे अतिशय प्रभावी चित्रण केले आहे. हे पुस्तक वाचताना मन थक्क होतं, डोळे पाणावतात आणि अंतर्मनात एक प्रेरणादायी ठिणगी पेटते. लेखिकेने केवळ घटनांची मांडणी केली नाही, तर त्या घटनांमागील भावभावनाही अत्यंत प्रभावीपणे उलगडल्या आहेत. गोल्डाची साधी राहणी, स्पष्टवक्तेपणा, आणि राष्ट्रासाठीची निष्ठा यामुळे ती वाचकांच्या मनात खोलवर रुजते. मला वाटतं, हे पुस्तक म्हणजे एका स्त्रीच्या असामान्य प्रवासाची साक्ष देणारा आरसा आहे. गोल्डा मेयरच्या जीवनातील संघर्ष, त्याग आणि नेतृत्वगुण हे आजच्या पिढीसाठीही तितकेच प्रेरणादायी आहेत. विशेषतः महिलांसाठी हे पुस्तक एक सशक्त संदेश देते — "स्वप्न मोठं असावं, आणि त्यासाठी झगडण्याची तयारीही."
वीणा गवाणकर यांनी गोल्डा मेयर या इस्रायली नेत्या आणि पंतप्रधानाच्या जीवनाचा अतिशय अभ्यासपूर्ण आणि भावस्पर्शी वेध घेतला आहे. गोल्डा मेयर यांचा प्रवास एका सामान्य ज्यू मुलीपासून इस्रायलच्या पंतप्रधानपदापर्यंतचा आहे. एका सामान्य रशियन ज्यू कुटुंबातील मुलगी अमेरिकेत स्थलांतर करते, आणि पुढे इस्रायलच्या राष्ट्रनिर्मितीच्या संघर्षात स्वतःला झोकून देते — ही कहाणी केवळ ऐतिहासिक नाही, तर ती मानवी जिद्द, धैर्य आणि निष्ठेची कहाणी आहे. त्या केवळ राजकारणी नव्हत्या, तर एक धाडसी विचारवंत, राष्ट्रनिष्ठा आणि स्पष्टवक्त्या नेत्या होत्या.
गोल्डाविषयी बोलायचं तर गोल्डा म्हणजे 'कधी किबुत्झमध्ये कुक्कुटपालन शिकणारी, तर कधी बालवाडीत कपडे धुणारी ही स्त्री, पुढे आंतरराष्ट्रीय राजकारणात धाडसी निर्णय घेणारी पंतप्रधान होते, पण तरीही स्वयंपाक घर मात्र सोडत नाही कधी. तिच्या खुपश्या देशपातळीवरच्या चर्च्या अथवा निर्णय तिच्या छोट्याश्या स्वयंपाक घरात गरम पाण्यात पाय ठेवून कॉफीचे घोट घेत घेत सिगारेटींचा कश मारत घेते... ' वा 'स्वतःला स्त्रीवादी न म्हणवणारी, पण स्त्रीवाद्यांसाठी आदर्श ठरलेली ही गोल्डा!'.
🗣️ गोल्डाची काही प्रेरणादायी वाक्ये:
"Trust yourself. Create the kind of self that you will be happy to live with all your life." (स्वतःवर विश्वास ठेवा. असा व्यक्तिमत्व घडवा की ज्याच्याशी तुम्हाला आयुष्यभर आनंदाने जगता येईल.)
"One cannot and must not try to erase the past merely because it does not fit the present." (भूतकाळ विसरण्याचा प्रयत्न करू नका, फक्त तो वर्तमानात बसत नाही म्हणून.)
"I am also a woman. But I am not a feminist. I am a Zionist." (मी स्त्री आहे, पण मी स्त्रीवादी नाही. मी झायोनिस्ट आहे.)
या वाक्यांमधून त्यांच्या विचारसरणीचा ठामपणा आणि आत्मविश्वास दिसतो. पुस्तकात या विचारांना लेखिकेने अतिशय सुंदरपणे गुंफले आहे.
🌟 गोल्डा मेयर: एक प्रेरणादायी नेत्या
गोल्डा मेयर यांचा जन्म ३ मे १८९८ रोजी कीव, युक्रेन येथे झाला. बालपणीच त्यांच्या कुटुंबाने अमेरिकेतील मिलवॉकी, विस्कॉन्सिन येथे स्थलांतर केले. लहानपणापासूनच त्यांनी झायोनिस्ट चळवळीत भाग घेतला आणि ज्यू लोकांसाठी स्वतंत्र राष्ट्र स्थापनेची मागणी केली.
🕊️ इस्रायलमध्ये योगदान:
१९२१ मध्ये त्या पॅलेस्टाईनमध्ये स्थलांतरित झाल्या आणि इस्रायली समाजातील कामगार संघटनांमध्ये सक्रिय झाल्या.
इस्रायल स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले:
कामगार मंत्री (१९४९–१९५६): स्थलांतरितांसाठी रोजगार आणि घरांची सोय
परराष्ट्र मंत्री (१९५६–१९६६): आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत केले
पंतप्रधान (१९६९–१९७४): १९७३ च्या यॉम किप्पूर युद्ध काळात देशाचे नेतृत्व
🧠 नेतृत्व आणि वारसा: गोल्डा मेयर यांना त्यांच्या ठाम विचारसरणी, स्पष्टवक्तेपणा आणि इस्रायलच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे ओळखले जाते. त्यांनी महिलांसाठी राजकारणात एक नवा मार्ग उघडला आणि आजही त्या एक प्रेरणास्त्रोत मानल्या जातात.
त्यांचे निधन ८ डिसेंबर १९७८ रोजी जेरुसलेम येथे झाले.
🌟 हे पुस्तक वाचताना मला जाणवले की गोल्डा मेयर यांचे जीवन म्हणजे एक प्रेरणादायी धडपड आहे. त्यांच्या निर्णयांमध्ये भावनांचा ओघ होता, पण राष्ट्रहित हेच अंतिम ध्येय होते. त्यांच्या साधेपणातही एक तेज होतं.
जर तुम्हाला इतिहास, आत्मचरित्रं आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांमध्ये रस असेल, तर हे पुस्तक तुमच्या वाचनसूचीत नक्की असावे.
#Golda Meir: A Biography of Vision, Dedication, and Leadership Reading a biography on Golda Meir is more than just an inspiring journey into the life of an extraordinary leader; it serves as a guide on how dedication and strong vision can lead to lasting impact. Golda Meir, Israel's first female Prime Minister, embodies the qualities of perseverance, resilience, and unwavering commitment to a cause. Her life story teaches us not just about political leadership but also about the essence of what it means to hold true to one's convictions, especially when faced with adversity. From her early life in #Ukraine to her leadership in #Israel, Meir's journey was anything but easy. She faced numerous challenges, from poverty and displacement to fighting for a fledgling state's survival in a volatile region. But what stands out about her leadership is her ability to remain steadfast in her beliefs despite the many obstacles that came her way. Golda Meir understood that all situations would not always be in her favor. There were moments of intense personal and professional struggle, but she refused to give in. In a world of fluctuating circumstances, her consistency and clarity of thought allowed her to lead with unparalleled conviction. One of the key lessons from Meir's story is that visionary leadership does not always mean having things easy. In fact, true leadership is about navigating the complexities of difficult situations while staying true to your goals. Golda Meir’s time as Prime Minister, especially during the Yom Kippur War, was marked by moments of uncertainty and criticism. Despite the overwhelming challenges, she kept her vision intact, focusing on what was necessary for Israel’s survival and future prosperity. Meir's leadership reminds us that when things are not going as planned, it’s essential to maintain direction, adapt, and work towards the larger goal. Meir’s unwavering commitment to her mission and her country is a testament to the power of a focused, dedicated mindset. She didn’t shy away from the tough decisions, nor did she allow the difficulties of her position to deter her from what she believed was right for Israel. Her influence is not just in her policies or decisions but in her ability to inspire others to rally behind her vision, even when the odds seemed insurmountable. As we reflect on Golda Meir’s life, it's clear that leadership isn’t just about being in a position of power or having all the answers. It’s about taking action, being resilient in the face of challenges, and inspiring others to believe in a cause that’s bigger than any one person. Golda Meir was more than a political figure—she was a visionary who showed the world that effective leadership is about conviction, purpose, and the ability to navigate through the toughest of times with grace and determination. Reading about her life not only offers inspiration but also a powerful lesson in leadership that is as relevant today as it was during her time.
या पुस्तकात फक्त गोल्डा बद्दलच नाही तर स्वतंत्र ज्यू राष्ट्र कसं उभं राहिलं हे देखील अत्यंत रंजक पणे मांडलं आहे. सोपी भाषा, वाचकाला गुंतवून ठेवणारी लेखन पद्धत आणि मुळातच अतिशय तगडा विषय, फारच मजा आली वाचताना. Kindle ebook version मधे शुद्धलेखनाच्या अनेक चुका मात्र वाचताना खटकतात.
खरोखरच अतिशय प्रभावशाली व्यक्तीचे आयुष्य लिहिणाऱ्या वीणा ताई चे आभार. अतुल काहाते यांच्या इस्राएल- पॅलेस्टाईन bias लेखांपेक्षा हे खूप उत्तम आहे. सर्वांनी वाचावे असे पुस्तक.
My 3 stars are mainly for the Kindle copy. I’m sure the hard copy must be alright, but the Kindle copy is purely atrocious! It had soo many typing/printing mistakes! Indian roads might have less number of pits than that. A very good story, even with a great storyteller, became a drudgery to read because of those mistakes. Horrific. I started taking screenshots, but stopped as it’s on almost every page. Few example that I remember- खिया/स्त्रिया, निबंध/निर्बंध- हे शेवटचे फनी होते, कारण ब्रिटीशांनी घातलेले निबंध वाचून माझी जाम करमणूक झाली. असो.