लेखिकेच्या लहानपणीच्या (वय वर्षे 8 ते 11) आठवणींचा अतिशय तरल, उत्कंठावर्धक आणि तितकाच भावविभोर पट म्हणजे हा कथासंग्रह आहे. सदर पुस्तकास महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह सहा पुरस्कार प्राप्त आहेत. एकाच पुस्तकाला एकाच वर्षात सहा पुरस्कार मिळण्यात लेखिकेचे अतिशय प्रामाणिक प्रसंगवर्णन, घटना वाचकाच्या डोळ्यासमोर जिवंत करण्याचे कसब हेच महत्वाचे शक्तिस्थळ आहेत. प्रत्येकाने जरूर वाचावे असे एक उत्कृष्ट पुस्तक...
ह्या पुस्तकाला एकूण ५ पुरस्कार आहेत... आणि शीर्षकावरूनच पुढे काय असेल ह्याची कल्पना येतेच. खूप मनापासून लिहिलेलं आहे आणि आवर्जून वाचावं असे आहे. लेखिकेच्या लहानपणीच तीन वर्षाचा काळ झटकन डोळ्यासमोरून निघून जातो.. आणि पुस्तक संपत कधी कळत नाही. काळाच्या ओघात लुप्त झालेल्या अनेक साध्या गोष्टी... त्यातला अविस्मरणीय आनंद आता नाही याची खंत नक्की वाटते. साधं, सोप्पं आणि सुबक.... दीर्घकाळ लक्षात राहील असं काही !!
अतिशय सुंदर पुस्तक. शहरातील जीवनात अनेक सुख सोयी मिळतात असे आपणास नेहमीच वाटत राहते. चांगले राहणीमान, चांगल्या शाळा, चांगले दवाखाने. मात्र या खोट्या आशेपोटी आपण मौल्यवान ग्रामीण जीवन गमावून बसत आहोत. हेच या पुस्तकातून एक प्रकारे दिसून येते. आलापल्ली हे गडचिरोलीतील एक गाव जेथे लेखिकेने बालपण घालवले आणि तिथल्या मुक्कामाचा अमूल्य अनुभव पुस्तक स्वरूपात आम्हास ऊपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद..
Such a simple language is used to narrate childhood experience, that one almost lives those by self and best part is the innocence it portrays. Loved every word of it.
असं आयुष्य आता कोणाला मिळणार. सोपे शब् देद नेम ते मीके वर्णन . उगीच मोठा पसारा नाही. त्यांचे बालपण त्यांच्या मैत्रिणी अगदी डोळ्यासमोर उभ्या केल्या. अल्लापल्ली मला दिसलेले ते बाबा आमटे यांच्या नजरेतून.नपन आज छान दुसरी बाजू पण दिसली.