आजवरच्या माझ्या आध्यात्मिक साधनांच्या प्रवासात मला भेटलेले अवलिये, गुरु, योगी यांच्याकडून मला बरंच काही शिकायला मिळालं, आत्मसात करता आलं आणि साधनेला दिशा देता आली. माझ्या संपर्कात आजही असे कित्येक अवलिये, फकीर आणि साधक आहेत. प्रत्येकजण निराळा आहे. प्रत्येकाची साधना, वर्ग निरनिराळा आहे; पण तरीही त्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे आध्यात्माचा, ईश्वरनिष्ठेचा, समर्पणाचा आणि मोक्षप्राप्तीसाठीच्या धडपडीचा...! प्रत्येकाने मला खूप काही शिकवलं, चमत्कार दाखवले (आणि त्यात अडकणं किती धोक्याचं आहे, हे देखील शिकवलं.) अनेकांशी अनेक चर्चा झाल्या. सत्याच्या अधिकाधिक जवळ जाता आलं. पुढचा प्रवास स्पष्ट झाला. मला हे जे अनुभव ध्यानातून आणि प्रत्यक्ष भेटीतून आले तसेच ते या पुस्तकाच्या
Gives insights towards Karma. Guidance towards Dhyana and Stotra benefits. Abolishing some myths about way of spirituality. Inspiring to live a balanced life of both spiritual and material.