जगाच्या कानाकोपऱ्यांतल्या मराठी माणसाला मराठी साहित्यातली दर्जेदार पुस्तकं, कवितासंग्रह वाचण्यासाठी सहज उपलब्ध असणं ही थोडी कठीण असणारी गोष्ट आधुनिक तंत्रज्ञानानं सहज शक्य करून दाखवली आहे. इबुक किंवा इआवृत्ती यांमुळं हे शक्य झालंय. आपण छापील पुस्तक वाचताना पुस्तकाची पानं उलटतो आणि पुस्तक वाचतो. इबुक वाचण्यासाठी आपल्याकडे दोन पर्याय उपलब्ध असतात... पहिला पेज फ्लीप पेज आणि दुसरा स्क्रोल स्क्रीन. कुठल्याही भाषेतलं आपल्या आवडीचं पुस्तक आपण इबुकच्या स्वरूपात कोणत्याही इ-माध्यमांद्वारे कधीही, कुठेही वाचू शकतो. आपल्याला हवं ते इबुक निवडणं, ते खरेदी करणं आणि त्याचा व्यवहार पूर्ण करणं या प्रक्रियासुद्धा फारशा किचकट नाहीत. असंच ‘नित्य निरंजन’ हे प्रख्यात लेखक स्वामी जगन्नाथ कुंटे यांचं एक लोकप्रिय पुस्तक आता इबुक स्वरूपात उपलब्ध आहे. शाश्वत शांतता आणि स्थैर्य यांचं प्रतीक असलेली निळी ज्योत तसंच नितळ निळ्या आकाशात विहरणारा एखाददुसरा पांढराशुभ्र ढग असं मोजक्याच रंगांत सजलेलं इबुकचं मुखपृष्ठ वाचकाचं लक्ष वेधून घेतं. लेखकाला गुरुस्थानी असलेल्या श्री.टेंबे स्वामी महाराज, श्री अक्कलकोट स्वामी महाराज, श्री शंकर महाराज, श्री गजानन महाराज, श्री गुळवणी महाराज, श्री दत्तमहाराज कवीश्वर, श्री रावसाहेब सहस्रबुद्धे आणि श्री भक्तराज महाराज यांची रंगीत छायाचित्रं इबुकमध्ये आहेत. गुरूंचं लेखकाच्या आयुष्यातलं स्थान या इबुकमधून उलगडत जातं. माणसाचं मन, त्याच्या मनाचा निग्रह, त्याच्या मनाची शक्ती, ही शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असणारी साधना, या साधनेची माध्यमं, साधना करताना येणाऱ्या अनंत अडचणी, समोर येणारी प्रलोभनं या सगळ्या गोष्टींचा सखोल विचार लेखनात जाणवत राहतो. खरं वैराग्य असलेले सद्गुरू शोधून सापडत नाहीत... तर असे सद्गुरूच आपल्या शिष्याला शोधत येतात. प्रत्येक व्यक्ती आपलं पूर्वसंचित घेऊन जन्माला येते... तसंच खरा साधक आपल्या गतजन्मीच्या साधनेचं संचित घेऊन पुढल्या जन्मात जातो. गतजन्मीची साधना साधकाला स्वस्थ बसू देत नाही. साधकाच्या असंख्य प्रश्नांची उकल करण्यासाठी आणि साधकाला असह्य मानसिक अस्वस्थतेतून बाहेर काढण्यासाठी मग सद्गुरूच अवतरतात आणि साधकाच्या आयुष्याचा पुढला प्रवास सुखकर करतात. आपला हा विचार वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लेखकानं अविनाश आणि त्याचा परिवार तसंच शेटजी आणि त्यांच्या पत्नी या पात्रांचा वापर चपखलपणे केला आहे. दिल्लीस्थित सांसारिक अविनाशमधलं आत्यंतिक वैराग्य आणि त्याला असलेली पत्निदेहाची अतिओढ या दोन्ही परस्परविरोधी भावना त्याला सतत अस्वस्थ करायला लागतात. यामुळे त्याचा स्वभाव घुमा, गंभीर होतो. या विचित्र कोंडीत सापडलेला अविनाश सद्गुरूंच्या शोधार्थ हिमालयात पोहोचतो. इथंच त्याला आत्मभान येतं. संसार करत भौतिक जगात राहून करण्याची साधना आणि अरण्यवासात असताना करण्याची साधना या दोन्हींमधला फरक तसंच या दोन्हींमधलं साम्य लेखकानं इथं फार सोप्या शब्दांत मांडलं आहे. मानसपूजा हा शब्द आपण खूप वेळा ऐकतो पण मानसपूजा कशी करावी याचं सूक्ष्म तपशीलवार वर्णन लेखकानं या इबुकमध्ये केलं आहे. साधकाला षड्रिपूंवर विजय मिळवता आला पाहिजे. मनाचा संयम ठेवणं ही खूप कठीण गोष्ट असली तरी ती अशक्य नक्कीच नाही. साधक ध्यानधारणा, शक्तिपात साधना यांचा आधार घेतो... तर सामान्य मनुष्य नामस्मरणाची कास धरतो या दोन्हीही गोष्टींमुळे शक्ती जागृत होते हे मात्र नक्की असे लेखक ठामपणे सांगतात. या विचारात अधिक सुस्पष्टता आणण्यासाठी रामकृष्ण परमहंस, सारदा माँ, योगी अरविंद, तुकाराम महाराज, मीराबाई या संतांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा आधार लेखक देतात. समाजात स्त्रियांना चुकीची वागणूक देणाऱ्या जुन्या, बुरसटलेल्या रूढींवर, परंपरांवर लेखक कठोर टीका करतात. साधनामार्गात स्त्री-पुरुष असा भेदच नाही हे ते स्पष्ट करतात. किंबहुना स्त्री ही आदीशक्ती, सर्वशक्तिशाली जगन्माता असून तिची बरोबरी कुणाशीही होऊ शकत नाही असं लेखकाला सांगायचंय. पूर्वी आपल्या समाजात वर्णव्यवस्था प्रचलित होती. साधक, त्याची साधना, त्याच्या साधनेचं पूर्वसंचित या सगळ्या गोष्टी वर्णांवर कधीच अवलंबून नव्हत्या. जातपात, रंगरूप, श्रीमंती-गरिबी यांचा साधकाशी आणि त्याच्या साधनेशी काहीही संबंध नाही असं लेखकाचं आग्रही मत आहे. हा मुद्दा विषद करताना चर्मकार रईसदास, संत कबीर अशा थोर सत्पुरुषांची उदाहरणं लेखक देतात. संपूर्ण इबुकमध्ये हिमालयातल्या सृष्टीसौंदर्याच्या वर्णनाबरोबरच भौतिक जगातल्या तपशिलांचं भानही लेखकानं ठेवलं आहे. लेखनाची भाषाशैली ओघवती आणि रंजक आहे. ‘नित्य निरंजन’ हे इबुक वाचताना प्रत्येकाला एक वेगळा आनंद, एक वेगळी अनुभूती नक्कीच मिळेल. रूढ समजुतींना धक्के देत साधनामार्ग सोप्या आणि सुगम शब्दांत मांडण्यामध्ये, साधनामार्गावरच्या प्रवासातल्या विलक्षण वेधक अनुभवांची अनोखी कहाणी आपल्यासमोर ठेवण्यामध्ये लेखक जगन्नाथ कुंटे कमालीचे यशस्वी झालेले आहेत... त्यामुळंच ‘नित्य निरंजन’ हे इबुक नुसतं वाचणंच नव्हे तर संग्रही ठेवणंही अनिवार्य आहे.
Good to read about the rough process sadhus get themselves into. You will learn about many great sadhus along the way. Shaktipat diksha was new for me. He explained and also suggested many other books to learn from about Shaktipat sadhana. Read if you can overlook foul language and repetition of few sentences and ideas throughout the book.
Its similar to previous book Narmade har har. Location is changed here. However, the difference between both the books is,in previous book,Narmada parikrama and journey was highlighted and was fantastic. This one emphasised more on philosophical part. The logic given is very good, some times self contradiction but still I liked this one, only for the philosophy part. The general story of meeting a person who is in search of Guru is okay, so so..
ह्या पुस्तकात अध्यात्मिक बद्दल खूप छान माहिती आहे. साधना कशी करावी एकदम सोप्या भाषेत दिली आहे. काही गैरसमज पण दूर होतात. मानसपुजा कशी करावी हे पण छान सांगितले आहे.
Writing style to explain a complex subject. Charismatic and yet so straight in the eye. Interesting experiences to an extent that it looks so mesmerizing.