डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यतेचे घाव झेलत व अवहेलनेला सामोरे जात, जिद्द आणि कठोर मेहनतीच्या बळावर, सबंध प्रतिकूलतेवर मात करून ज्ञान संपादन केले. त्यांनी त्या ज्ञानाचा उपयोग समाज आणि देशासाठी केला. दलित आणि दलितेतर चळवळीला प्रेरणा दिली. अस्पृश्यांवर होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिला आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढले. ते मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विश्वविख्यात शिक्षण संस्थांतून सर्वोच्च पदव्या मिळविल्या, तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र य