मानवी मेंदू आणि मन यासंबंधी मानवी संस्कृतीच्या सुरुवातीपासून मानवास कुतूहल आहे. ही गूढ रहस्ये सोडविण्याकडे विज्ञानाचे लक्ष जाण्यापूर्वीपासून तत्त्वज्ञानी आणि धार्मिक/आध्यात्मिक नेत्यांनी यावर विचार केला होता. गेल्या काही वर्षात ही स्थिती बदलली आणि या गोष्टीचा शास्त्रीय विचार होऊ लागला. ट्रांझिस्टर आणि इलेक्ट्रॉनिक क्रांतीमुळे मानवी मेंदू आणि मन यांच्या संशोधनास एक नवी दिशा - एक नवी मिती प्राप्त झाली आणि गेल्या काही वर्षांत या संशोधनात झपाट्यानं प्रगती झाली. या संशोधनाचे स्वरूप आणि त्यासंबंधीचे निष्कर्ष हे सामान्य माणसाच्या कायम आवाक्याबाहेरचे राहिले. स्वयंवेध या पुस्तकात हे संशोधन आणि त्याचे निष्कर्ष यासंबंधीची माहिती सोप्या नि सुबोध भाषेत वाचकां&#