सामान्यतः सर्व चौकटींच्या पल्याड निसर्गासमवेत सत्य, शुद्धता आणि परम त्यागावर बेतलेले आयुष्य जगणारे महात्मा गांधी हे सहस्रकातील एक आश्चर्यच होते. शाकाहार आणि निसर्गाशी एकरूप होत त्यांनी प्रकृतीचा, आरोग्याचा, आहाराचा अतिशय महत्त्वपूर्ण असा अभ्यास केलेला होता. त्यांनी लिहिलेल्या "आरोग्यनी कुंजी"चा अनुवाद मराठी वाचकांना करून देणं ही एक अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. म्हणूनच ब्रिजमोहन हेडा यांनी केलेला हा अनुवाद गांधीजींचे आरोग्यविषयक विचार, प्रकृतीविषयक अभ्यास सामान्यजनांना लाभदायक आहे. हा अभ्यास उपयुक्त, महत्त्वपूर्ण आणि चिंतनास उद्युक्त करणारा आहे. म्हणूनच हे अनुवादित पुस्तक प्रकाशित करतांना एक महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त ठेवा लोकांच्या हाती देतांना &