'एक ना धड'ला महाराष्ट्र शासनाचा २००८ चा सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक हा राज्यपुरस्कार मिळाला आहे. एका सामान्य कारकुनाच्या आयुष्यातले प्रसंग लेखकाने मिश्किल शैलीत मांडले आहेत. ऑफिसमधले त्यांच्याबरोबर काम करणारे सहकारी असोत किंवा वेळीअवेळी घरी येऊन त्रास देणारे शेजारी असोत, तुम्ही पुस्तक वाचताना मंगेश जोशींचे आयुष्य जगाल.