रहस्य ही एक अशी भयकथा आहे जी एका आगळ्यावेगळ्या रहस्याने सुरु होते व तशाच एका आगळ्यावेगळ्या रहस्याने. संपते देखील... आणि या रहस्यांच्या शोधाची वाटचाल तुम्ही या कथेमध्ये अनुभवणार आहात. कथा एका जुन्या वाड्या पासून सुरू होते. एक असा वाडा जो गेली अनेक वर्षे बंदिस्त ठेवण्यात आला होता... कारण तो वाडा पछाडलेला होता! आणि आपल्या खानदानी वाड्याचं हे रहस्य उलगडण्यासाठी अनिरुद्ध आपल्या सहा मित्रांसोबत त्या वाड्यामध्ये जातो, आणि त्या वाड्यात घडणाऱ्या पुढील घटनांचे कारण ठरतो. त्या वाड्या संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा तो जीवतोड प्रयत्न करतो मात्र जसजसे तो एकएक रहस्य उलगडू लागतो तसतसे त्याच्या समोर नवनवीन रहस्यांचे प्रकटीकरण होत राहते. ज्यामुळे तो या रहस्यांच्या खेळाम&