अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भात विविध ठिकाणी विविध वेळी ज्या घटना घडल्या अथवा प्रश्न निर्माण झाले, त्यासाठी त्या त्या वेळी हे लेख लिहिलेले आहेत. स्वाभाविकच त्यामध्ये एक प्रासंगिकता आहे. परंतु संपूर्ण पुस्तक नजरेखालून घातले, तर असे लक्षात येईल, की यामध्ये एक सूत्रही आहे. हे लेखन धागा ठरवून झालेले नाही, तर चळवळीच्या विचार व अनुभवातून झाले आहे. त्यामुळे स्वाभाविकच चळवळीच्या चतु:सूत्रीत ते आपोआपच गुंफले गेले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कशासाठी? त्याची एक चतु:सूत्री आहे.
तर्कशुद्ध विचार आणि आचार यांचा मुद्देसूद प्रचार करणारे लेखक. एका मित्राने recommend केल्यामुळे नरेंद्र दाभोळकर वाचायला घेतले आणि या बुद्धिवादी विचारांत गेला महिनाभर पुरेपूर गुरफटून गेलो. शाळेत, कॉलेजात असल्यापासून नरेंद्र दाभोळकरांविषयी खूप गैरसमज होते ते सर्व दूर झाले. दाभोळकरांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य फक्त हिंदू नाही तर बाकी धर्मांतही त्याच जोमाने चालू होते/आहे हे समजले. “वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कार्यकारणभाव तपासणे. प्रत्येक कार्यामागे कारण असते आणि ते मानवी बुद्धीला समजू शकते.” ही नरेंद्र दाभोळकरांची quote कधीही विसरणार नाही!