जीवघेणं गुपित… जीवावर बेतणारं गुपित.. ए सी पी प्रद्युम्न, ऐच्छिक सेवानिवृत्तीनंतर कोकणात शेती घेऊन शांत आयुष्य जगण्याचं स्वप्न पाहत होते. परंतु पंतानी त्यांना रवीराज कडेठाणकरांचं काम करावं अशी विनंती वजा आज्ञा केली. पंताचा शब्द ते टाळू शकत नव्हते. रवीराजची पत्नी सुगंधाचा पाच वर्षांपूर्वी हॉटेलच्या सूटमध्ये संशयास्पद मृत्यु झाला होता. तेव्हा नुकत्याच निवडणूका जाहीर झाल्या होत्या. विरोधकांनी जनतेसमोर ते प्रकरण अशा रितीने मांडलं की जणू रवीराजनेच आपल्या पत्नीचा खून केला आहे. परिणामी त्यांना निवडणूकीत हार पत्करावी लागली होती. आता पुन्हा लवकरच निवडणूका जाहीर होतील. रवीराज कडेठाणकर नुसते निवडूनच येणार नाही तर ते मुखमंत्री पदाचे दावेदार आहेत पण….