साने गुरुजी म्हणजेच पांडुरंग सदाशिव साने हे समाजसुधारक, शिक्षक, श्रेष्ठ प्रतिभावंत लेखक होते. त्यांच्या अनेक कथा, कादंबऱ्या, कविता, लेख, इ. प्रसिद्ध आहे.
यांपैकी श्यामची आई हे पुस्तक त्यांनी नाशिकच्या तुरुंगात असताना लिहिले.
लहानग्यांपासून ते थोरामोठ्यांच्या आवडीचे पुस्तक म्हणजे श्यामची आई.!!!
साध्या सोप्या भाषेत लिहिलेले हे पुस्तक म्हणजे साहित्यप्रेमींसाठी एक अनोखी पर्वणीच.
फक्त मुलांनीच नव्हे तर आईवडिलांनी सुद्धा आवर्जून वाचावे असे हे पुस्तक.
छोट्या छोट्या गोष्टींमधून साने गुरुजींनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या आहेत.
लहानग्या श्यामचा साने गुरुजी म्हणून ओळखले जाईपर्यंतचा प्रवास वाचणं म्हणजे आयुष्यभरासाठी प्रत्येक वळणावर उपयोगी पडेल अशी शिकवणचं जणू.
लहानपणीचं वागणं, आजूबाजूचे वातावरण, आईची शिकवण, वडिलधाऱ्यांचा धाक, या साऱ्या गोष्टी त्यांचे जीवन घडण्यास अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या.
त्यांची आई यशोदाने दिलेली शिकवण त्यांच्या आयुष्यात कुठे कशी प्रभावी ठरली हे वाचणं मायलेकराचं नातं कसं असू शकते याचं उत्तम उदाहरण आहे.
गरिबी, कष्ट, त्याग या वातावरणात आईने अत्यंत मोलाची शिकवण दिली आहे.
आईने त्यांना स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर व्हायला शिकवले. चुकांमधून शिकायला सांगितले. अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. खरेपणा आयुष्यात किती महत्त्वाचा आहे हे सांगितले.
श्यामची आई हे मातृत्व,प्रेम, करुणा आणि शिस्त यांचे प्रतिरूप आहे.
आई आणि मुलामधल्या निस्सीम प्रेमाची कथा जी साधारण असूनही असाधारणतेचा कळस गाठते.
आईने दिलेली शिकवण, अनेक अनुभव उत्कृष्ट रित्या वर्णिले आहे.
त्या आईने दिलेली शिकवण आज पूर्ण जग अनुसरू शकते.
या पुस्तकामुळे कित्येक पिढ्या घडल्या आहेत आणि न जाणे अजून कितीतरी पिढ्या घडतील.
प्रेम, माणुसकी,करुणा, कृतज्ञता,भक्ती, जिव्हाळा,संस्कार ,माया इ. चा अर्थ या पुस्तकाकडे पाहून कळतो.
या सत्यकथा वाचताना डोळे भरून येतील.
हे हृदयस्पर्शी जिवंत लिखाण एकदातरी नक्कीच वाचून पहा.