या माझ्या दुसऱ्या कथा संग्रहात वेळोवेळी वेगवेगळ्या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या माझ्या कथांचा समावेश आहे. बहुतेक वेळा एखादा कथासंग्रह संकलित करताना, कथा कोणत्या साच्यात साधारण ठीकठाक बसतात याचा अंदाज बांधणे गरजेचे असते.क्वचित प्रसंगी पुस्तक विकत घेणाऱ्या आणि बहुतेकवेळा ग्रंथालयातून घरी नेऊन वाचणाऱ्यांना हे वर्गीकरण सोयिस्कर असते. नाहीतर बासमती तांदूळ अशी चिठ्ठी लावलेली पिशवी उघडावी आणि त्यातून अळिंबे निघावीत असा काहीतरी अपेक्षाभंग होतो.त्यामुळे या कथासंग्रहाला कोणत्या ढाच्यात बसवावे याबाबत माझा थोडासा संभ्रम होत होता. कारण यात विज्ञान काल्पनिका आहेत, काही गुन्हेगारीच्या कथा आहेत, काही विडंबनपूर्ण कथा आहेत, काही परामानसिक विश्वासांवर आधारित कथा आहे&#
या पुस्तकातील साऱ्याच गोष्टी वाचकाला गुंगवून ठेवणाऱ्या आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक गोष्टीत कुठलीही ओढाताण न करता एक ट्विस्ट आणणे लेखकाला जमलेले आहे. वाचताना लेखकाचा विविध विषयांचा अभ्यास प्रकर्षाने जाणवत राहतो. विशेषतः चित्रकला विषय लेखकाच्या अधिक आवडीचा असावा असे वाटते. काही गोष्टींचे शेवट अधिक सफाईदार होऊ शकले असते असे वाटते.