रानकवी म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित असणाऱ्या ना. धों. महानोर यांचं ललित लिखाणही तितकंच सकस आणि मनात रुंजी घालणारं आहे. विशेषत: पळसखेडच्या आठवणींचं अन् तिथल्या गावगाड्याचं वर्णन करताना त्यांचा शब्द न् शब्द जिवंत होतो. या आठवणी म्हणजे केवळ उदास स्मरणरंजन नव्हे. गावखेड्यातलं समृद्ध जगणं भरभरून अनुभवलेल्या, तिथल्या सुख-दुःखाला सहजपणे सामोरं गेलेल्या एका निर्मळ माणसाने उलगडून दाखवलेलं तितकंच निर्मख जग म्हणजे आठवणींचा झोका. या रानकवीने त्याच्या कवितेइतक्याच रसाळ भाषेत लिहिलेल्या अनुभवांचा हा अस्सल खजिना.