लागवड करताना स्थानिक अथवा देशी झाडे वापरावीत हा विचार आता समाजात रुजतो आहे. परंतु जिथे लागवड करणार आहोत त्या प्रदेशाचा, जमिनीचा, अधिवासाचा अभ्यास करून हा उपक्रम राबविणे निसर्ग हिताचे ठरते. लागवड ही ‘पुनरुज्जीवना’बरोबर जोडली गेली पाहिजे. हे का आणि कसे करायचे याची शास्त्राला धरून मांडणी करण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.
झाडांची निवड हा यातला दुसरा मुख्य विषय. निवड सोपी जावी याकरता आम्ही महाराष्ट्राचे चार विभाग केले आहेत. यादीतील प्रत्येक नावापुढे त्या विभागाची आद्याक्षरे लिहिली आहेत. ते बघून झाडांची निवड करावी. ह्या त्या त्या विभागात सर्वसाधारणपणे सहजपणे आढळणाऱ्या जाती आहेत. एखादी जात दुसऱ्या विभागातील केवळ एखाद्या लहान वैशिष्ठयपूर्ण ठिकाणी दिसत असेल त