"हा… हा… तर अजितचा आवाज आहे", रोहित थरथरत्या आवाजात म्हणाला.
"हो…"
'वाचवा मला…', पुन्हा अजितचा आवाज आला.
"तिकडून येतोय आवाज… चल लवकर", रोहित म्हणाला.
रोहित आणि विजय दोघेही सावध झाले आणि आवाजाच्या दिशेने पळू लागले. झुडुपांच्या दाटीवाटीतुन पळत दोघेही एका ठिकाणी पोहोचले. एका भल्या मोठ्या झाडाखाली दोघे उभे होते.
भयाण अशा जंगलात घडले एक विपरीत, असे का घडले होते, कोणी केले होते आणि काय इतिहास होता या काजळी वनाचा. जाणून घेण्यासाठी वाचा कथा काजळी वन.
Some books are not impressive but not bad to read. This is one of those book. The main plot is not very solid however the writing style is good. If you have ample time, go for this....