धार्मिक संघर्ष हा जितका जुना आहे तितकीच जुनी धार्मिक समन्वयाची भावनाही. जगन्नाथपुरीचं मंदिर अन ओरिसातला वैष्णव धर्म, मोगल अन अफगाणांची शेकड्यांनी आक्रमणं झाली, तरी अबाधित राहिला. त्याचं संरक्षण करण्यास शर्थीचे प्रयत्न करणारा धर्मवीर राजा रामचंद्रदेव, त्याचा स्वभावावर, शोर्यावर लुब्ध झालेली एक मुस्लीम सरदाराची कन्या रजिया! त्यांच्या प्रेमातून निर्माण झाला सांस्कृतिक समन्वय! धर्ममार्तंडाचा गलका वाढला, त्या धुराळ्यात माणूस म्हणून परस्परांना आधार देणारे हे दोन जीव निराधार झाले, जीवनातून उठले. त्यांच्या व्यथावेदनांना साकार करणारी ऐतिहासिक गाथा -