भारतात सर्वाधिक प्रमाणात पूजिला जाणारा देव म्हणजे शिवमहादेव. त्याच्यावर आधारित मुर्तीही अनेक प्रकारच्या आहेत. रुद्र, शिवलिंग आणि शिवाच्या सामान्य आणि विशेष प्रकारातील अनेक प्रकाराच्या मूर्तीसंबंधी, त्यामागील कथाधार आणि त्यापैकी काहीतून प्रकट होणारे तत्वज्ञान या सर्वांचा विचार या पुस्तकात मांडलेला आहे.