आज सारं जगं त्यांना धर्मांध माथेफिरू म्हणून ओळखत.. भस्मासुरासारखं अक्राळ-विक्राळ रूप धारण करणाऱ्या अशा दहशतवादांच्या मूळ प्रेरणा कोणत्या आणि स्वार्थासाठी त्यांना कठपुतळ्यांप्रमाणे नाचवणाऱ्या साम्राज्यवादी सुत्रधारांचे मनसुबे कोणते, याचा नावनिशी वार केलेला हा पंचनामा. धर्म-अधर्माचा तात्विक काथ्याकुट न करता प्रत्यक्ष व्यवहारातील संघर्ष चितारणारी हि शोधकथा अनेकदा चीड आणते आणि तशीच अस्वस्थही करून सोडते.
आपल्या क्षुद्र स्वार्थासाठी अमेरिकेने वेळोवेळी दहशतवादी संघटनांना सर्वतोपरी मदत केली आणि संपूर्ण जगालाच अभद्र संकटात पाडले. नंतर स्वतःच पेरलेल्या कडू फळाची चव लागल्यावर सारवासारव करून आपली प्रतिमा मात्र अबाधित ठेवली. इस्लामी जगातील कल्पनातीत दहशतवादाची वर्णनं वाचकांना थक्क करून सोडतात. धर्म ही अफूची गोळी आहे यावर हे पुस्तक वाचून नक्कीच विश्वास बसतो.
दहशतवादासारखा एकदम क्लिष्ट विषय , गिरीश कुबेरांपेक्षा दुसरा कोणी समजावून सांगूच शकत नाही. १८ व्या शतकापासून सुरवात करून २१व्या शतकाच्या सुरवतीपर्यंत एकदम सोप्या शब्दात मांडलेलं लेखन. दहशतवाद समजावून घेणाऱ्यांसाठी एकदा नक्कीच वाचावे अस...
दहशतवादाच्या इतिहासाची पुस्तक,असेच म्हणता येईल.या पुस्तकातून दहशतवाद आपल्याला नव्या रूपात भेटतो.गिरीश कुबेरांची लेखनशैली आपल्याला खिळवून ठेवते.हे पुस्तक म्हणजे मनोरंजन व ज्ञानाचा combo pack आहे.