जगातल्या नावाजलेल्या कंपन्या म्हणून ज्यांचा आज आपण सर्वार्थाने उल्लेख करतो त्या कंपन्यांनी आपली सुरुवात कशी दुर्दम्य इच्छा व दृढ विश्वासाच्या बळावर केली, हे या पुस्तकातून अत्यंत साध्या-सोप्या भाषेत लेखनबद्ध झाले आहे. यामुळे आपली कंपनीकडे बघण्याची दृष्टी कशी सकारात्मक बनते आणि जागतिक अर्थव्यवस्थेला भक्कम बनवण्यास या कंपन्या कसा हातभार लावतात, हे सहजपणे नजरेत भरते. या सबंध कंपन्या आज अनन्यसाधारण म्हणून गणल्या जातात; परंतु प्रत्येक कंपनीला प्रारंभकाळी खूप मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले हेही तेवढेच सत्य. या जगप्रसिद्ध कंपन्यांनी मानवीजीवन सुकर आणि उन्नत करण्यात मोलाचा वाटा उचललेला आहे. अशा निवडक बत्तीस कंपन्यांचे व्हिजन, त्यांची व्यवस्थापकीय शैली यांचा &