Jump to ratings and reviews
Rate this book

sangini

Rate this book
No Description

205 pages, Kindle Edition

Published April 24, 2021

Loading...
Loading...

About the author

Kiran Gavhane

1 book2 followers

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
2 (50%)
4 stars
1 (25%)
3 stars
0 (0%)
2 stars
0 (0%)
1 star
1 (25%)
Displaying 1 - 2 of 2 reviews
Profile Image for Kiran Gavhane.
Author 1 book2 followers
October 8, 2022
अद्भुतपणे नटलेल्या जादुई जगातील अकल्पित, अविस्मरणीय अशा गोष्टींचा संग्रह म्हणजेच माझे हे पहिले पुस्तक संगिनी. यात अगदी सुंदर असं अमरत्व असून देखील मृत्यूसाठी आतुर झालेल्या एका सुंदर स्त्रीची गोष्ट आहे. अयोग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचलेल्या आणि अनाहूतपणे एका गोड-कटू पर्वाचा भाग बनलेल्या एका गुलामाची गोष्टदेखील तितकीच निराळी आहे! शिवाय यात आहे एक भला मोठा शैतान, दैत्य, दानव, पिशाच्च, बदमाश, गलिच्छ अशी कित्येक नावे घेऊन जगत असलेला भीमकाय मानव - एक बीभत्स मानव - त्या जगातील कित्येकांनी त्याच्याबद्दल अनेक मुखांद्वारे अनुभवलेल्या गोष्टींसम...! अनेक आतंकी कृत्यांचा स्वामी - मनुष्यविनाशी अशी त्याची ओळख - क्रूरकर्मा अशी त्याची प्रसिद्धी पण आता केवळ नाममात्र म्हणून उरलेल्या एका शैतानाची गोष्ट! अगदी अंतिम क्षणी, मृत्यूची वाट पाहत असतानादेखील, आपल्या कटू पण अनुभवी शब्दांनी राजपुत्राला सुनावणाऱ्या एका सम्राटाची गोष्ट तर अतुलनीयच आहे. अशा कित्येक गोष्टींनी सामावलेलं हे जग आपल्यात मिसळून गेलेल्या नयनरम्य दृश्यांनी अधिकच मोहून टाकतं. तर दुसरीकडे, असंख्य काळ अजिंक्य असलेल्या, पण आता केवळ क्षुल्लक पराजयाने त्रस्त झालेल्या कलाकाराची गोष्टदेखील तितकीच विलक्षण आहे. अशाच अजूनही बऱ्याच गोष्टी आपापल्यापरीने सर्वोत्तम आहेत, आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी तत्पर आहेत.
सुंदर अशा शब्दांनी विणलेलं, लयबद्ध भाषेने प्रवाहित झालेलं हे माझं पहिलं पुस्तक सर्व वाचकांसाठी एक पर्वणीच आहे.
चला तर मग सहभागी व्हा माझ्या या जादुई जगात आणि अनुभव घ्या एका क्रूरपर्वाचा, एका प्रारंभाचा, आणि त्यातच एका अंताचा!
संपर्क: ८७८८३७०५७६
Profile Image for Akash Balwante.
104 reviews4 followers
June 14, 2021
लेखकाने प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावर वि.स.खांडेकर यांच्या लेखनशैलीचा प्रभाव आहे. पुस्तकात अनेक लघु प्रेम कथा असून पुस्तकाचे संगिनी नाव हे पुस्तकाला शोभते. पुस्तकाची भाषा ही खूप अलंकारिक आहे आणि शब्द रचना ही प्रख्यात लेखकांनाही जमणार नाही अशी आहे. लेखकाच्या लिखाणाची ही जमेची बाजू म्हणता येईल.
गोष्टी सुरुवातीला वाचताना खूप जड वाटतात पण नंतर त्यातील शाब्दिक अलंकारिक खेळ मनाला भावतात. लेखकाचा हा पहिला प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे.
लेखकाने भविष्यात त्यांचे उपजत शाब्दिक सौन्दर्यालंकाराची जोड रमणीय कथांना दिल्यास ते या क्षेत्रात प्रतिथयश होतील.
Displaying 1 - 2 of 2 reviews