एक सिद्धहस्त अभिनेत्रीचा सफरनामा…एका प्रतिभासंपन्न दिग्दर्शिकेचा बहुआयामी आत्मशोध!मराठी रंगभूमीला नवतेचं भान मिळालं,अनेक नवे नाटककार / कलावंत घडले,मराठी नाटकाच्या कक्षा विस्तारल्या;हे सारं घडलं, ते बाईंमुळे.वाचकाला विश्र्वासात घेऊन बाई सांगताहेत गोष्ट…स्वत:ची आणि मराठी रंगभूमीची,आपल्या दिलखुलास, प्रसन्न शैलीत.आठवणींच्या धाग्यांचं हे मुलायम विणकामवाचकांना बांधून ठेवेल हे नि:संशय!
मी वाचलेले मराठीतील अप्रतिम पुस्तक. ज्याना ज्याना नाट्य सृष्टीची आवड आहे त्यांच्या साठी अतिशय महत्वाचे पुस्तक. तसेच इतर वाचकाना हे पुस्तक गुंगवून ठेवेल . विजया बाईनी या आत्मचरित्रा मध्ये त्यांच्या नाट्य विषयक कारकीर्दीचा प्रामुख्याने तळमळीने लिहिले आहे. कुठेही आत्म प्रौढीचा दर्प येत नाही. तसेच फाजील विनयीपणा सुद्धा नाही. वैयक्तिक जीवना विषयी त्यांनी आवश्यक किंबूहना थोडे कमीच लिहिले आहे. तेही अतिशय तटस्थपणे लिहिले आहे. जरूर जरूर वाचा. दर्जा ९/१०.