पुस्तकाविषयी थोडेसे.. प्रत्येक गोष्टीचा शेवट गोड हवाच.. तो झाला नाही तर गोष्ट पूर्ण झाली नाही असं समजायचं.. "अँड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर.." ही प्रेम, खुन्नस आणि सस्पेन्स वाढवणारी एक रोलर कोस्टर राईड आहे. ही गोष्ट आभा, राजस आणि रायन च्या आयुष्याभोवती फिरते. आभा च्या आयुष्यात राजस येणार की रायन? रायन आभा च्या आयुष्यात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करणार आणि त्यात यशस्वी होणार की त्याच्याच आयुष्यात एक वेगळंच वादळ येणार? विचार सुद्धा केला नसेल अश्या काही अनपेक्षित घटना घडणार तर कधी अनपेक्षित घटना विचार करायला भाग पाडणार आहेत. कादंबरी लिहिण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे...चुका झाल्या असतील तर समजून घ्याल. आणि मला आशा आहे की तुम्हाला हे पुस्तक नक्की आवडेल. पुस्तक आवडलं नाही तरी प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका. माझा इमेल आयडी- kulkarnianujaa@gmail.com