एकविसाव्या शतकात देश एक महासत्ता होण्याचे स्वप्न पहात आहे. खेदाची बाब म्हणजे, देशाला स्वातंत्र्य मिळून ७० पेक्षा अधिक वर्ष झाली तरी भटका विमुक्त वडार समाज मुलभूत गरजापासून वंचित राहून लाजीरवाण जीवन जगात आहे. खाण या कादंबरीतून लेखकाने वडार समाजाचे वर्तमान जीवन ओघवत्या , उत्कंठावर्धक शैलीत मांडला आहे. मन विदार्ण करणारीही कलाकृती मराठी साहित्याच्या ऐश्वर्यात भर टाकून नवीन मापदंड तयार करेल.