Jump to ratings and reviews
Rate this book

manatl avkash

Rate this book

87 pages, Unknown Binding

First published June 12, 2006

1 person is currently reading
22 people want to read

About the author

Sunita Deshpande

9 books15 followers

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
4 (21%)
4 stars
5 (26%)
3 stars
10 (52%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
Displaying 1 - 4 of 4 reviews
Profile Image for Pradnya.
325 reviews106 followers
November 10, 2018
It's a collection of the articles by author published in newspapers and magazines. The range of the topics shows the depth of the study Sunita Deshpande has done. Her references to the books like The little prince, Sand, The desert, the outsider, and the old man and the sea along with others gives a glimpse of how well-read she was. Also being a wife of beloved Pu. La., she got opportunity to meet the contemporary legendary poets and writers. She tells few incidents about the same.
I always believed that she had a mesmerising personality and because of her decisions to protect and support Pu. La., she didn't write much as she could. From her writings one finds a very strong, rational and thoughtful woman. This book is no exception. While reading I put it down often to feel, understand and realize the pearls of wisdom she often throws around in her strong sentences. It made me think again about my views on many things, which we often take for granted. To give an example, she asks that "we kill mosquitoes just because it had tried to find its food. Do we human ever wonder why we punish animals this way? " It's not verbatim but her thoughts are profound and need not be rushed through, rather read after letting the first one sink. I am not sure if it's fortunate to have such an author in Marathi or it's misfortune to have such greatness confound in Marathi - the language limited in small geographical area. Nonetheless, it's fortunate to have found her and meet her through her writings.
Profile Image for In.
157 reviews1 follower
October 13, 2021
स्ट्रीम ऑफ कॉनशिअसनेस ही एक लेखनशैली आहे. अगदी व्हाट्सअँप वर हजारदा पाठवला गेलेला गायीवरचा निबंध असो किंवा व्हर्जिनिया वूल्फ चे लांबलचक निबंध, नावात सांगितल्या प्रमाणे मनात येत असलेले विचार त्याच आवेगाने शब्दबद्ध केलेले असतात. इथे लेखक डायरी लिहिल्याप्रमाणे सहजगत्या लिहीत जातो. वाचकाचं स्थान तिथे थोडंसं दुय्यम असतं असं मला वाटतं.

कुठलाही प्रकाशित साहित्यप्रकार हा किमान दोन ध्रुवांना जोडणारा असतो, लेखक आणि वाचक. त्यामुळे दोघांचाही सहभाग महत्वाचा ठरतो. स्ट्रीम ऑफ कॉनशिअसनेसमध्ये लेखक अधिकांश प्रमाणात वरचढ होत असतो आणि वाचकाची अनेकदा फरफट होण्याशी शक्यता असते. व्हर्जिनिया वूल्फ च्या लेखांमध्ये मला जे जाणवलं तेच मला इथे सुनीताबाईंच्या निबंधांत जाणवलं.

निबंधातले विचार अतिशय प्रगल्भ आहेत. रोजच्या अनेक गोष्टींकडे थोड्याश्या कुतूहलाने पाहिलं की जे अनेक प्रश्न पडू शकतात. लेखिकेलाही असे अनेक प्रश्न पडले. मूळची संवेदनशील वृत्ती असल्याने अश्या कुतुहलांचा लेखिकेने थोडासा खोलात जाऊन विचार केला आणि अनेक लेख आकाराला आले. हा लेखसंग्रह हे त्याच लेखांचे संकलन आहे. एखाद्या मूर्त विषयाबद्दलचे लेख अधिक वाचनीय झालेले आहेत जसे की एका कोळियाने बद्दलचा लेख. पण भावनिक विषयांवरचे लेख अधिकाधिक स्ट्रीम ऑफ कॉनशिअसनेस वर जातात आणि त्यांची (माझ्यापुरती तरी) वाचनीयता थोडी कमी होते.प्रत्येक निबंध हा फारतर ३-४ पानांपेक्षा मोठा नाही. हा संक्षिप्तपणा माहितीपर लेखात फापटपसारा टाळण्यासाठी अतिशय उपयुक्त असला तरी, ललित लेखात उगीच घाई-घाई केल्यासारखा आडवा येतो.

बरेचसे लेख लोकसत्ता दैनिकात पूर्वप्रकाशीत झालेले आहेत. (उत्कृष्ट ललित लेखांना, अनेकानेक वर्षे मंच उपलब्ध करून देण्यासाठी लोकसत्ताचे आभार).

मनातलं अवकाश हे नाव त्यांचं नाही, ते त्यांच्या आप्तांपैकी एकानी सुचवलेलं आहे. हे नाव आणि मुखपृष्ठ दोन्हीही जमून आलेले आहेत. ८७ पानांचं हे पुस्तक संग्रही ठेवण्याजोगं आहे. मधेच कधीतरी एखादा लेख पुन्हा वाचल्यास तो तुम्हाला वेगळ्या मानसिक अवस्थेत नेईल हे नक्की.
Profile Image for Vijay.
127 reviews16 followers
December 5, 2019
एक चिंतनशील आणि विचारसंपन्न साहित्यिका म्हणून सुनीता देशपांड्यांची ओळख करून देणारं हे पुस्तक.
Profile Image for Vikram Choudhari.
53 reviews12 followers
October 28, 2025
● पुस्तक – मनातलं अवकाश
● लेखिका – सुनीता देशपांडे
● साहित्यप्रकार – लेखसंग्रह, ललित 
● पृष्ठसंख्या – ८७
● प्रकाशक– मृण्मयी प्रकाशन
● आवृत्ती – ०३ री | प्रथम आवृत्ती - २००६ 
● पुस्तक परिचय – विक्रम चौधरी
● मूल्य - १७५  रुपये
● मूल्यांकन - ⭐⭐⭐

'प्रिय भाई एक कविता हवी आहे..!' हा मुक्ता बर्वे यांनी सादर केलेला कार्यक्रम पहिला. पुलं आणि सुनीताबाई यांच्या वैचारिक आणि वैयक्तिक जीवनाला हळुवारपणे स्पर्श करणारा तो प्रयोग होता. तेंव्हापासून सुनीताताई देशपांडे यांच्या व्यक्तीमत्वाबद्दल एक विलक्षण कुतूहल निर्माण झालं. पुलंच्या छायेत राहूनही त्या  एक कणखर, तर्कशुद्ध, वैचारिक दृष्ट्या समृद्ध स्त्री म्हणून नेहमी लक्ख दिसत राहिल्या. कधी त्यांनी जी. ए. कुलकर्णी यांना लिहिलेल्या पत्रांतून, कधी मुक्त वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहासारख्या लेखांतून तर कधी मर्ढेकर, बा. भ. बोरकर यांच्या कवितेच्या केलेल्या रसग्रहणातून.. सुनीताबाईंनी स्वतःची वेगळी अशी एक ओळख निर्माण केली. 'आहे मनोहर तरी'. 'प्रिय जी.ए.' (पत्रसंग्रह), 'मण्यांची माळ' (ललित), 'समांतर जीवन' आणि 'सोयरे सकळ' हि त्याची काही गाजलेली पुस्तके.  

मनातलं अवकाश हे पुस्तक त्यांनी लिहिलेल्या व विविध वृतपत्रांतून (मुख्यतः 'लोकसत्ता') आणि मासिकांतून प्रकाशित झालेल्या लेखांचा संग्रह आहे. यातील सारे लेख म्हणजे जणू विचारांचा मुक्त प्रवाह आहे. रोजच्या जीवनातील गोष्टींकडे पाहण्याची त्यांची दृष्टी, प्रत्येक गोष्टीचा विचार, त्यांचा जाणिवा एका नव्या अंतर्दृष्टीने भारलेल्या आहेत.

हे पुस्तक वाचताना सतत वाटत राहत कि हे लिखाण त्यांनी वाचकांसाठी नव्हे तर स्वतःसाठी केलेलं आहे, जणू काही त्या त्यांच्या रोजनिशीत स्वतःचे विचार लिहीत आहेत. प्रत्येक लेख २-३ पानांचा, संक्षिप्त पण प्रभावी. पुस्तकाची सुरुवात पुलांसोबतच्या 'आठ आण्यातल्या लग्नापासून' होते. त्याच्या जीवनातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि ती देखील इतक्या साध्या पद्धतीने कशी पार पडली तसेच बरोबर ५४ वर्षांनी त्याचा तारखेला पुलं गेले आणि त्यांनी सुनीताबाईंचं जीवन कसं समृद्ध केलं हे अधोरेखित केलं आहे. 

या पुस्तकातील लेख दैनंदिन जीवनातील साध्या गोष्टीपासून ते गहण वैचारिक प्रश्नांपर्यन्त सगळ्या विषयांना हात घालतात. विविध प्रतिभावंत लेखकांचा लाभलेला सहवास, त्यांचे लिखाणाचे दुवे वेळोवेळी पुस्तकात वाचावयास मिळतात. तसेच पुस्तकाचा दुसरा पैलू हा सुनीताबाईंच्या अफाट वाचनाचा परिचय करून देणारा, ज्यात त्या 'द सँड', 'द डेझर्ट', 'द आउटसाइडर' आणि 'द ओल्ड मॅन अँड द सी' सारख्या पुस्तकांचा उल्लेख करतात. हे लिखाण करताना सुनीताबाई रोजच्या गोष्टींकडे नव्या डोळ्यांनी आणि संवेदनशील दृष्टीने पाहण्याचा आग्रह करतात.

बा. सी. मर्ढेकर, बा. भ. बोरकर, केशवसुत, जी. ए. कुलकर्णी अशा दिग्गज समकालीन साहित्यिकांचा सुनिताबाईंवर असलेला प्रभाव हळूच एखाद्या कवितेच्या ओळीतून पुस्तकात डोकावून जातो. पुलंच्या माध्यमातून त्या समकालीन साहित्यिकांशी त्या जोडल्या गेल्या, त्या आठवणींना देखील सुनीताबाईंनीं उजाळा दिला आहे.

एक गोष्ट आवर्जून नमूद करावी वाटते ती म्हणजे मुक्त विचारसरणीच्या लेखन शैलीत लेखिकेचं मनोगत स्पष्ट होत पण इथे वाचक दुय्यम वाटतो कारण भावनिक विषयांवर केलेलं भाष्य कुठे कुठे अपुरं वाटत. तसेच हे पुस्तक जरी फक्त ८७ पानांचं असलं तरी त्यात दडलेलं वैचारिक वैभव अमर्याद आहे. जीवनातल्या छोट्या गोष्टींवर जे तात्विक आणि संयुक्तिक भाष्य लेखिकेने केले आहे ते समजून घेण्यासाठी पुस्तक संथगतीने वाचावं लागत, समजून घ्यावं लागतं. कदाचित जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हे पुस्तक त्या त्या VANTAGE POINT वरून वेगळं भासेल. 'क्षितिज' आणि 'पाणी' हे लेख मला वाचनीय वाटले आ��ि बाकी लेखांमध्ये वाचण्याची लय सतत कुठतरी खंडित होत असल्याच जाणवत राहिलं.  

एकंदरीत, हे पुस्तक जगण्याचा आणि जगाचा अनुभव घेतल्यानंतरच्या वैचारिक खजिन्याचं संकलन आहे. हे लेख वाचताना,  शांताबाईंनी लिहिलेलं 'माझे विदयापीठ' तसेच दुर्गा भागवतांनी लिहिलेलं 'माझ्या जीवनातील व्यक्ती आणि घटना' या पुस्तकांची आवर्जून आठवण झाली. स्त्री लेखिकेच्या 
दृष्टिकोनातून जीवनाचे पैलू उलगडणारी ही पुस्तके जीवनाकडे नव्या नजरेने पाहण्यास प्रेरित करतात.

एका संवेदनशील, विचारवंत आणि जाणीवा समृद्ध असणाऱ्या स्त्रीच्या मनातील तात्विक भाव जाणून घेण्यासाठी नक्कीच वाचा.. 

Displaying 1 - 4 of 4 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.