घरची गरिबी असल्याने शिक्षणाची आवड असूनही अनेकांची शिकण्याची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. ग्रामीण भागात तर सोईही कमी असतात. पण अशा वातावरणात स्वबळावर शिकण्याची हिंमत दाखविणार्या नायकाची कथा बाबा भांड यांनी ‘काजोळ’मध्ये रंगविली आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवर ही कथा फुलते. गावातील वातावरण, विविध स्वभावाची माणसे, अपप्रवृत्ती, हेवेदावे त्याचप्रमाणे सत्प्रवृत्ती, निरपेक्ष वृत्ती माणसांमध्ये बघताना बालमनावर होणारे संस्कार, त्यातून कथानायकाचे फुलणारे व्यक्तिमत्त्व, शिक्षणासाठीची धडपड दिसते. ग्रामीण जीवन व तेथील माणसांचे स्वभाव याची झलक यातून बघायला मिळते.