पोलिसातली नोकरी म्हणजे माणसाला मुळापासून हलवून टाकणारा अनुभव. कायद्याची अंमलबजावणी करत असताना अनेकदा पोलिस अधिकाऱ्यांच्या मनाची कुतरओढ होते, कायद्यातल्या पळवाटांमुळे नाही रे वर्गावर अन्याय होत असल्याचं बघावं लागतं. ना ही कुतरओढ व्यक्त करता येते, ना फरफट. अर्थात कधी कधी निखळ समाधानाचे क्षणही वाट्याला येतात.वर्दीच्या आतला माणूस हे सारं कसं पचवतो?तीस वर्षांच्या पोलिसी सेवेतील अनुभवांबाबत, व्यवस्थेबद्दल, समाजातल्या भल्या-बुऱ्या प्रवृत्तींबाबत ज्येष्ठ पोलिस अधिकारी सदानंद दाते यांनी केलेलं चिंतन.
इथे स्वतःच्या कामगिरीचा बडेजाव नाही. अलंकारिक भाषा नाही. सनसनाटी खुलासे नाहीत. टोकाच्या भूमिका आणि त्यांची समर्थनं नाहित. इथे 'व्यवस्थेचा एक भाग' म्हणून काम करताना आलेले अनुभव ,शिकवणी आहेत. या एका प्रोफेशनल पोलिस अधिकाऱ्याच्या 'संवेदनशील' मनाने घेतलेल्या नोंदी आहेत.