सुदेश आणि आकाश दोघेही लेखक. कॉलेजमध्ये असल्यापासून दोघांची मैत्री. एम.ए ची पदवी घेतल्यानंतर दोघांनीही लिखाण करायला सुरुवात केली. दोघांचे लिखाणाचे विषय तसे वेगळे, सुदेशने सुरुवातीपासून भय आणि गूढ कथा लिहिण्यास सुरुवात केली होती, आकाशचा कोणता एक विषय नव्हता, तो इतरही विषयांवर लिखाण करायचा. प्रेमकथा, ललित साहित्य यावरील आकाशचे लेखन वाचकांना आवडायचे, पण सुदेशचे लिखाण अतिशय भन्नाट असायचे, रहस्य, भय कथा तो अगदी मनापासून लिहायचा, त्याची प्रत्येक कथा वाचकांनी अगदी डोक्यावर घेतली, पुस्तकांना भरभरून प्रतिसाद दिला. त्याच्या अनेक कथांवर लघु चित्रपट तयार होऊ लागले आणि एका मोठ्या बजेटच्या चित्रपटासाठी त्याचे लिखाण पूर्ण होत आले होते. सोशल मीडियावर तर त्याचे बघता बघता लाखो अनुयì