मंत्रमुग्ध झालेल्या रोहितने पाणी घेण्यासाठी हात पुढे केला आणि अनावधानाने त्याचा तिला स्पर्श झाला, पण त्या स्पर्शाने जणू हजारो इंगल्या अंगभर फिरल्याचा भास रोहितला झाला, तरीही तो तिच्याकडेच पाहत राहिला. इतकी सुंदर स्त्री त्याने यापूर्वी जन्मात कधी पहिली नव्हती. त्याच्या नकळत त्याने तिचा हात धरला होता. हळू हळू त्याला जाणवले आपल्या शरीरात काहीतरी वळवळत आहे, आणि त्याच्या वेदना हळू हळू असह्य होत आहेत. हाता पायांमधून ती कळ मस्तकाला जाऊन भिडली आणि… रोहित नावाच्या एका निष्पाप तरुणासोबत एक भयंकर विचित्र घटना घडली होती. एका गावातून तो अचानक नाहीसा झाला होता. कोण होत त्याच्या नाहीशा होण्यामागे. जाणून घेण्यासाठी नक्की वाचा मोहिनी.