वि. ग. कानिटकर गेली पस्तीसहून अधिक वर्ष मराठी साहित्याची अविरत सेवा करणारे जेष्ठ साहित्यिक आहेत. नाझी भस्मासूराचा उदयास्त, चर्चिल, माओ क्रांतीचे चित्र आणि चरित्र, युद्ध युद्ध आणि युद्धच, फाळणी टाळणारा महापुरुष लिंकन ही त्यांची पुस्तकं अतिशय लोकप्रिय ठरली आहेत. मुक्ताफळे हा खुसखुशीत ललित लेखनाचा संग्रह, शहरचे दिवे, होरपळ या कादंबऱ्या, पूर्वज, आणखी पूर्वज, लाटा हे कथासंग्रह त्यांच्या समृद्ध ललित लेखनाचा आवाका दर्शवतात. मध्यम वर्गीय मराठी माणसाच्या आयुष्यातल्या विसंगतीचे हृदयस्पर्शी चित्रण करणारा जोगवा इत्यादी साहित्यसंग्रह मराठी साहित्याचे दालन समृद्ध करणारा ठरत आहे यात शंकाच नाही.