Jump to ratings and reviews
Rate this book

लिहित्या लेखकाचे वाचन

Rate this book
मराठी समीक्षेच्या प्रचलित प्रवाहांमध्ये सहजासहजी सामावून जाणार नाही "अशी समीक्षा डॉ० विलास सारंग गेली काही वर्षे लिहीत आहेत. तीव्र कल्पनाशक्ती, सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि साहित्यकृतीवर रोखलेली नजर या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे सवयीच्या गोष्टींमधूनही त्यांना काहीतरी नवे जाणवत राहते. डॉ० सारंगांना अनेक गोष्टींबद्दल कुतूहलही वाटते. साहजिकच एरव्ही समीक्षेच्या क्षेत्रात प्रवेश नाकारलेली अनेक नवी आशयसूत्रे त्यांच्या समीक्षेत प्रवेश करतात आणि तिला ताजेपणा व वैविध् देतात. 'सूक्ष्म वाचना'ची पद्धती डॉ० सारंगांना विशेष प्रिय आहे. तथापि, या पद्धतीला अनेकदा ते विशिष्ट संहितेच्या सीमारेषांपलीकडे घेऊन जातात. अनेकदा समाजवास्तव हीच त्यांची 'संहिता' ठरते.

सैद्धान्तिक समीक्षा आणि प्रत्यक्ष समीक्षा यांच्या जाणीवपूर्वक केलेल्या संकराला भोवतालच्या समाजवास्तवाचे आणि स्वतःच्या सर्जनशीलतेचे दुहेरी परिमाण डॉ० सारंग प्राप्त करून देतात. सखोलता आणि व्यामिश्रता यांच्याशी किंचितशीही तडजोड न करता अनौपचारिक शैलीची सहजता साधल्यामुळे त्यांची समीक्षा संवादसुलभ आणि वाचनीय होते.

'लिहित्या लेखकाचं वाचन'मधून डॉ० विलास सारंग यांच्या समीक्षालेखनाची ही सर्व वैशिष्ट्ये पुन्हा एकदा प्रकट झाली आहेत.

160 pages, Paperback

Published January 1, 2011

1 person is currently reading
2 people want to read

About the author

Vilas Sarang

26 books11 followers
One of the most significant modernist writer in Marathi writer and English, Vilas Sarang has written remarkable short stories, poems, a novel and also brilliant pieces of criticism in his first language Marathi as well as in English. His Marathi short story collections are 'Soledad' (1975) and 'Atank' (1999) and translations of his stories in English are collected in 'A Fair Tree of the Void' (1990) and more recently `The Women in the Cages' (2006). A selection of his short stories also appeared in French translation in 1988. His English novel 'The Dinosaur Ship'(2005) and his Marathi novel is `Enkichya Rajyat'. His Marathi collection of poems is published under the title Kavita 1969-1984 and his collection of English poems is published as 'A Kind of Silence'(1978) and recently he has brought out ` Another Life'. He has also written significant criticism in Marathi 'Sisyphus ani Bolakka' and 'Aksharanchya Shrama Kela'(2000).He has also published The Stylistics of Literary Translation ( 1988 ) and edited the anthology Indian English Poetry Since 1950 ( 1989. He has also edited reputed literary journals like the Bombay Review and The Post Post Review.

He holds a Ph. D. in English from Bombay University and another in comparative literature from Indiana University. He taught at the University of Basra in Iraq during the 1970s, became Professor of English and Chair of the Department of English at Bombay University in the eighties, and he has also taught at Kuwait University. He lives in Mumbai

The quest for primitive source of human existence is an important feature of his writings. His short stories are often surreal and have often been compared to Kafka. For instance, in one of his stories collected in The Women in Cages, the narrator finds himself transformed into a gigantic phallus. In another more well known story, a person named Chako is marooned on an island where women have either upper half of their bodies or the lower half. Sarang is awovedly anti-representational modernist in his aesthetics and provides a refreshing alternative to over-hyped `diaspora' and `exiled' non-resident Indian English writers like Salman Rushdie, VS Naipaul and Kiran Desai.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
1 (50%)
4 stars
1 (50%)
3 stars
0 (0%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
Displaying 1 of 1 review
Profile Image for In.
158 reviews1 follower
December 17, 2022
विलास सारंग ह्यांची पुस्तकं मी अजून वाचलेली नाहीत. पण ह्या पुस्तकाचा विषय रंजक वाटला म्हणून, आणि लोकसत्तात आलेल्या परीक्षणामुळे हे पुस्तक वाचायला घेतलं. समीक्षेविषयीचे हे लेख आधी दिवाळी अंकात येऊन गेले आहेत. त्याचे इथे संकलन आहे. म्हणजे सर्व लेख एकाच धाग्यात गुंफलेले नाहीत. कादंबरीचा विचार आहे तसच बुद्धाविषयी कुतूहल पण आहे. स्वतःच्या कादंबरीबद्दल समीक्षेचा प्रतिवाद आहे तसेच नेमाड्यांबद्दल मतप्रदर्शन सुद्धा.

एखाद्या कलाकृतीची जडणघडण जवळून पाहिली की त्या घडणीतला तर्क अधिक स्पष्ट दिसू लागतो आणि मग त्यातली जादू किंचित कमी होते. बुक्स ऑन बुक्स ह्या शैलीतली पुस्तके वाचली की थोडफार तसं वाटतं. पुस्तके आणि कादंबरीची वैचारिक चिकित्सा ज्यांना भावते त्यांच्यासाठी हे नक्कीच वाचनीय पुस्तक आहे. विलास सारंग सरळ स्पष्टवक्तेपणे आपली मतं मांडतात. इट डिपेन्डड्स असा काहीसा सूर लावून जो मुळमुळीतपणा आजकाल दिसतो त्यामधून हे पुस्तक उठून दिसतं.

मी स्वतः अगदीच सामान्य वाचक आहे त्यामुळे सारंग ह्यांची मते वाजवी आहेत की नाहीत ह्यावर भाष्य करू शकणार नाही, पण त्यांची सूक्ष्म वाचनशैली नक्कीच उद्धृत करण्याजोगी आहे. आजकाल आपण अपेक्षाच कमी करतो. मग ते बॉलीवूडच गाणं असो किंवा कुठल्यातरी नवीन उपाहारगृहातील कुठलीशी नवीन डिश. आपली मतं पक्की असतील तरी अनेकदा आपल्याला 'उगीच कशाला कीस पाडतोस प्रत्येक गोष्टीचा' असा घरचाच आहेर अनेकदा मिळतो. अश्या वेळी सूक्ष्म वाचन आणि त्यावर विचार हे जाणूनबुजून मशागत करायची चांगली गोष्ट आहे हे अशी पुस्तके मनावर बिंबवतात. एक लेख डॉ. हरिश्चंद्र थोरात ह्यांच्या लिखाणाबद्दल आहे. सगळ्यांनीच थोरात जरी झाले नाही तरी त्यांचे विचार समाज म्हणून अंगी बाणवायला हरकत नसावी,

'विचार' हा शब्द येथे गंभीरपणे वापरला आहे. विचार नेटकेपणाने करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते. हे प्रशिक्षण काही प्रमाणात राजवाडे-कोल्हटकरांनी प्राप्त केले होते असे म्हणता येईल. त्यानंतरच्या काळात साहित्य समीक्षेच्या क्षेत्रात वावरणाऱ्या लोकांना या प्रशिक्षणाची गरज वाटत होती, असे दिसत नाही. मनात येणाऱ्या स्वैर कल्पनाविलासालाच विचार म्हणण्याची प्रथा या काळात रूढ झाली. (२२४)


सगळ्याच्या मुळाशी कुठेतरी आपण दर्जावर तडजोड करतो ह्याचे व्यवस्थित आकलन आपल्याला व्हायला हवे. (अवांतर: 'दर्जा' (quality) बद्दल विचार करताना, झेन अँड द आर्ट ऑफ मोटरसायकल मेन्टेनन्स ची आठवण झाल्याशिवाय राहत नाही)

हे पुस्तक बव्हंशी थोड्या अकादमीक समीक्षेकडे झुकणारे आहे, आणि हाताळलेले काही विषय सुद्धा बौद्ध जातककथा आणि बाणाची 'कादंबरी' संदर्भात आहेत. आज २०२२-२३ मध्ये ह्या विषयांत किती वाचक रुची घेतील हा प्रश्न आहेच.

शेवटच्या प्रकरणात कादंबरीचे सध्याचे रुपडे आणि बदलणाऱ्या काळाची गरज ओळखून त्यातल्या स्थित्यंतराची गरज मांडणारे आहे ते सर्वांना वाचनीय ठरावे. नोंद करण्यासारखी गोष्ट ही की सारंग दुर्गा भागवतांबद्दल लिहितात, लक्ष्मण मान्यांबद्दल लिहितात आणि नेमाडे तर आहेतच. ह्यातलं सर्वात आताचं पुस्तक म्हणजे मान्यांचं उपरा, १९८० मधलं आणि हे सारंगांचं हे पुस्तक २०११ मध्ये आलं. कादंबरीबद्दल, विशेषतः पुढच्या मराठी साहित्याबद्दल लिहिताना, १९८०-२०११ मधला मोठा काळ रिकामा दिसतो. सारंगांनी ह्या काळात मराठीत काय नवीन झाले त्याबद्दल भाष्य करणारे काही लेख पुस्तकासाठी विशेष लिहिले असते तर पुस्तक अजून समावेशक झालं असतं. किंडल सारख्या उपकरणांचे आगमन झालेले आहेच. आज पुस्तकाचा एकदिशामार्गीपणा (वन वे) बदलून ते अधिक परस्पर क्रियावंत (इंटरॅक्टिव्ह) (सारंगांचा शब्द) होऊ शकेल का हा शेवटचा मुद्दा विचार करायला बरंच काही देऊन जातो.

पुस्तकांविषयीची पुस्तके वाचणाऱ्याला हे नक्कीच आवडेल. इतरांना सुद्धा सूक्ष्म वाचन, चिकित्सा आणि समीक्षा ह्यातले काही शिकण्यासारखे ह्या पुस्तकातून जरूर मिळेल हे नक्की.
Displaying 1 of 1 review

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.