फॉर्मच्या पातळीवर अनेक कथात्म संरचनांनी जोडलेली श्याम मनोहरांची ही कादंबरी विविध भाषिक आणि वैचारिक वळणे घेत अनेक आशयसूत्रांना स्पर्श करते आणि समकालीन मराठी समाजावरील एका अर्थपूर्ण भाष्यांचे स्वरूप धारण करते.सर्जनशीलता हरवलेल्या,शोध घेण्याचा इतिहास गमावलेल्या र्हासप्राप्त समाजात ज्ञान,राजकारण,अध्यात्म,स्त्रीपुरूषसंबंध,भाषा आणि साहित्य या सर्वच व्यवस्थांची आणि त्यासंदर्भातील मूल्यभानाची काय अवस्था होते, याचे भेदक आकलन ‘कळ’मध्ये जागोजागी दिसून येते.
लेखक शून्यतेच्या सूत्रापासून प्रारंभ करून मोटरगॅरेजवाल्याच्या लेखनकृतीने संपणारी ही कादंबरी केवळ सामाजिक, नैतिक स्वरूपाचे प्रश्र्न न उभे करता एकूण ज्ञानव्यवस्था आणि साहित्यप्रकार म्हणून कादंबरी यांतील परस्परसंबंधांच्या आकलनाला एक नवीन दिशा देते.
श्याम मनोहर : (२७ फेबुवारी १९४१). मराठी कथा-कादंबरीकार व नाटककार. पूर्ण नाव श्याम मनोहर आफळे. जन्म भिकार तासगाव (जि. सातारा) येथे. त्यांचे प्राथमिक शिक्षण लिंब, अंगापूर आणि तासगाव येथे झाले. साताऱ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. तसेच सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालय आणि कराडचे सायन्स महाविद्यालय येथे उच्च शिक्षण घेऊन ते बी.एस्सी. झाले (१९६४) आणि पुणे विद्यापीठातून एम्.एस्सी. ही पदवी त्यांनी संपादन केली (१९६७). त्यानंतर अध्यापनक्षेत्रात शिरुन त्यांनी डॉ. दातार कॉलेज, चिपळूण; ज्ञानप्रबोधिनी, पुणे येथे काही काळ अध्यापन केल्यानंतर पुण्याच्या सर परशुरामभाऊ कॉलेजात ते प्राध्यापक म्हणून काम करु लागले आणि त्याच महाविद्यालयातून निवृत्त झाले. माध्यमिक शिक्षण घेत असतानाच ते लेखन करु लागले. 'काँपिटिशन' ही त्यांची पहिली कथा. त्यानंतर कथा, कादंबरी आणि नाटक ह्या तिन्ही साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले. आणि बाकीचे सगळे (१९८०) व बिनमौजेच्या गोष्टी (१९८०) हे त्यांचे दोन कथासंग्रह प्रसिद्घ आहेत. त्यांच्या कथांच्या शीर्षकांतही वेगळेपणा दिसून येतो. उदा., 'वासू अमक्यातमक्या ठिकाणी ऐसपैस', 'गुरुत्वापसरणाचे प्रदेश' इत्यादी. हे ईश्वरराव, हे पुरुषोत्तमराव (१९८३), शीतयुद्घ सदानंद (१९८७), कळ (१९९६), खूप लोक आहेत (२००२), उत्सुकतेने मी झोपलो (२००६) या त्यांच्या कादंबऱ्यांतून कादंबरीचे रुढ आकृतिबंध आढळणार नाहीत; तथापि समाजातील वेगवेगळ्या स्तरांतून आलेल्या व्यक्ती, त्यांचे एकमेकांशी येणारे संबंध, परस्परकिया, त्यांतील विसंगती, गुंतागुंत हे सर्व माणसांसंबंधीची आस्था न सोडता ते आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्घतीने व्यक्त करतात. माणसांना त्यांच्या जगण्यातून अनुभवास येणारे नैतिक प्रश्न ते उभे करतात आणि अस्वस्थतेची तीव जाणीव निर्माण करतात. उपरोधप्रचुरता हे त्यांच्या कादंबरीलेखनाचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य. त्यांचा उपरोध ते अतिशय साध्या पण अपेक्षित परिणाम साधणाऱ्या भाषेतून प्रकट करतात. मध्यमवर्गीयांच्या आत्मकेंद्रित वृत्तीमुळे येणारा जीवनाकडे प्रगल्भपणे पाहण्याचा अभाव हा अनेकदा त्यांच्या उपरोधाचे लक्ष्य ठरतो. शब्दांचा वापरही ते अनेकदा असांकेतिक पद्घतीने करतात. यकृत (१९८६), हृदय (१९८७), येळकोट (१९९३), प्रेमाची गोष्ट ? (१९९७), दर्शन (२००४) ह्या त्यांच्या नाटकांतूनही असांकेतिक लेखनाची वैशिष्ट्ये प्रत्ययास येतात. उत्कृष्ट कथालेखनासाठी कराड पुरस्कार (१९८३); सर्वोत्तम नाट्यलेखनासाठी नाट्यदर्पण पुरस्कार (१९८३, १९८६, १९९४); कादंबरीलेखनासाठी ह. ना. आपटे पुरस्कार (१९८४); गंगाधर गाडगीळ पुरस्कार (१९९४); उत्सुकतेने मी झोपलो या कादंबरीसाठी साहित्य अकादेमी पुरस्कार (२००८) त्यांना प्राप्त झाले आहेत.
"Kal" This book has given a very new outlook not only to me but each of my friend with whom I have shared this book. We have read selected pages together. Thenceforth, Shyam Manohar is one of my favorite writer. I have also read and liked very much, some of his other books, I am listing them here.
Khoop Lok Aahet (Novel) Shityuddh Sadanand (Novel) Darshan (Play) Donhi ani Binmoujechya Goashti (Short Stories)
Currently I am reading the last one. I am finding it very difficult to comprehend his short stories.
This is among the Best books which I read this year. Shyam manohar always made me happy. Probably my thinking matches with him. I agree with whatever he highlighted and has been highlighting in his books.
His books are realistic. They are outcomes of how actual life works in India as well as about world. kal is about Marathi as a language, literature and its pain. It highlights, various issues of marathi authors, publishers, thinking and people in general.
various stories [some are very short) highlights morally corrupt society. Overall, Shyam manohar continued his attack on this society. His lines/one liners/criticisms. He has a lot of valid anger about all these. Kal meaning pain.
I however, surprised by the reaction of people/readers, who complained that they have not understood what has been written in the book. Language is simple, the only thing one need to have is knowledge of society, political knowledge, general knowledge, reading knowledge.
One should read thins book, only after reading atleast 300 plus books that too serious books. after that, one should try to read serious authors like makarand sathe,shyam manohar, grace etc. if you are comfortable with their books, then its okay. These books are not for entertainment the are for revival of society [ Which surprisingly no one wants]