हिरवे हिरवेगार गालिचे - हरित तृणाच्या मखमालीचे; त्या सुंदर मखमालीवरती - फुलराणी ही खेळत होती. गोड निळ्या वातावरणात - अव्याज-मने होती डोलत; प्रणयचंचला त्या भ्रूलीला - अवगत नव्हत्या कुमारिकेला, आईच्या मांडीवर बसुनी - झोके घ्यावे, गावी गाणी; याहुनि ठावे काय तियेला - साध्या भोळ्या फुलराणीला ? पुरा विनोदी संध्यावात - डोलडोलवी हिरवे शेत; तोच एकदा हासत आला - चुंबून म्हणे फुलराणीला- "छानी माझी सोनुकली ती - कुणाकडे ग पाहत होती ? कोण बरे त्या संध्येतून - हळुच पाहते डोकावून ? तो रविकर का गोजिरवाणा - आवडला अमुच्या राणींना ?" लाजलाजली या वचनांनी - साधी भोळी ती फुलराणी ! आन्दोली संध्येच्या बसुनी - झोके झोके घेते रजनी; त्या रजनीचे नेत्र विलोल - नभी चमकती ते ग्रहगोल ! जादूटोणा त्यांनी केला - चैन पडेना फुलराणीला; निजली शेते, निजले रान, - निजले प्राणी थोर लहान. अजून जागी फुलराणि ही - आज कशी ताळ्यावर नाही ? लागेना डोळ्याशी डोळा - काय जाहले फुलराणीला ? या कुंजातुन त्या कुंजातुन - इवल्याश्या या दिवट्या लावून, मध्यरात्रिच्या निवान्त समयी - खेळ खेळते वनदेवी ही. त्या देवीला ओव्या सुंदर - निर्झर गातो; त्या तालावर - झुलुनि राहिले सगळे रान - स्वप्नसंगमी दंग होउन! प्रणयचिंतनी विलीनवृत्ति - कुमारिका ही डोलत होती; डुलता डुलता गुंग होउनी - स्वप्ने पाही मग फुलराणी - "कुणी कुणाला आकाशात - प्रणयगायने होते गात; हळुच मागुनी आले कोण - कुणी कुणा दे चुंबनदान !" प्रणयखेळ हे पाहुनि चित्ति - विरहार्ता फुलराणी होती; तो व्योमीच्या प्रेमदेवता - वाऱ्यावरती फिरता फिरता - हळूच आल्या उतरून खाली - फुलराणीसह करण्या केली. परस्परांना खुणवुनि नयनी - त्या वदल्या ही अमुची राणी ! स्वर्गभूमीचा जुळ्वित हात - नाचनाचतो प्रभातवात; खेळुनि दमल्या त्या ग्रहमाला - हळूहळू लागति लपावयाला आकाशीची गंभीर शान्ती - मंदमंद ये अवनीवरती; विरू लागले संशयजाल, - संपत ये विरहाचा काल. शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनि - हर्षनिर्भरा नटली अवनी; स्वप्नसंगमी रंगत होती - तरीहि अजुनी फुलराणी ती! तेजोमय नव मंडप केला, - लख्ख पांढरा दहा दिशाला, जिकडे तिकडे उधळित मोती - दिव्य वऱ्हाडी गगनी येती; लाल सुवर्णी झगे घालुनी - हासत हासत आले कोणी; कुणी बांधिला गुलाबि फेटा - झकमणारा सुंदर मोठा! आकाशी चंडोल चालला - हा वाङनिश्चय करावयाला; हे थाटाचे लग्न कुणाचे - साध्या भोळ्या फुलराणीचे ! गाउ लागले मंगलपाठ - सृष्टीचे गाणारे भाट, वाजवि सनई मारुतराणा - कोकिळ घे तानावर ताना! नाचु लागले भारद्वाज, - वाजविती निर्झर पखवाज, नवरदेव सोनेरी रविकर - नवरी ही फुलराणी सुंदर ! लग्न लागते! सावध सारे! सावध पक्षी ! सावध वारे ! दवमय हा अंतपट फिटला - भेटे रविकर फुलराणीला ! वधूवरांना दिव्य रवांनी, - कुणी गाइली मंगल गाणी; त्यात कुणीसे गुंफित होते - परस्परांचे प्रेम ! अहा ते ! आणिक तेथिल वनदेवीही - दिव्य आपुल्या उच्छवासाही लिहीत होत्या वातावरणी - फुलराणीची गोड कहाणी ! गुंतत गुंतत कवि त्या ठायी - स्फुर्तीसह विहराया जाई; त्याने तर अभिषेकच केला - नवगीतांनी फुलराणीला !
बालकवींची ‘ फुलराणी ‘ ही नितांतसुंदर कविता मराठी भाषेतील काव्यसौंदर्याचे एक मनोहर शब्दशिल्प आहे. या कवितेतील कल्पकता, तिचे भाषावैभव, भावलाघव हे सगळे इतके मोहक आहे की, बालकवी म्हटल्यावर फुलराणीचीच आठवण व्हावी.
One of the major reason to choose this book was to revisit some of the poems that I had read in school. This book is a collection of poems written by Tryambak Bapuji Thombre, popularly known as 'BalKavi'.
The speciality of his poems is that they are always based on nature and its beauty. His poems aptly convey the simplicity, childlike exuberance and yet the depth of nature and life. Each of his poems displays a different spark like 'Kavyachi Kalpana' is an amazing yet short description of the journey of an idea coming to the poet's mind and then on paper, 'shraavanmaas' is a description of monsoon and how beautifully it changes the environment around us, 'Audhumbar' a poem on a tree leaves you baffled as to how can he portray the picture that he wants to in so little words. The contrast he tries to create between 'Mi' and ' Anant' is thought-provoking. Good Read!