The Inspiring Story of Braveheart - ASHOK Kamte 26/11 Mumbai Terror Attack - Cama Hospital Incident Unfoldded...
This is the extraordinary story of Ashok Kamte, Additional Commissioner of Police, East Region, Mumbai who died fighting terrorists in the 26/11 attack in Mumbai. The inspiring story of one of the most courageous and promising Indian Police Service officers comes striaght from the heart of his wife, Vinita.
मित्रांनो सौ. विनीता अशोक कामटे व सौ. विनीता विश्वास देशमुख लिखित श्री भगवान दातार अनुवादीत "To The Last Bullet" (टु द लास्ट बुलेट) हे 26/11 तील शहीद DIG IPS अशोक एम. कामटे यांचे जीवनचित्रण वाचून काढले.. हे पुस्तक वाचताना मला आलेले अनुभव थोडक्यात सांगावेसे वाटतात... मित्रांनो मला फक्त माहिती होतं कि 26/11 वर आधारित 'To The Last Bullet' हे इंग्रजी पुस्तक प्रकाशित झालंय पण खरं सांगायचं तर ते विकत घेण्याचा कधी विचार मनात आला नाही..
2 तारखेला नागपुरला असताना नाथे बुक डिस्ट्रीब्युटर्स कडे सदर पुस्तक शिक्षकदिनानिमित्त 6 सप्टेँबर पर्यँत 15% सवलतीत उपलब्ध होतं.. मी फक्त पाने चाळून पाहिली व पुस्तक न घेताच परतलो.. पण मला हि पुस्तक काही सोडेना.. अर्थात या पुस्तकाचाच विचार माझ्या मस्तिष्कचक्रात सतत फिरत होता.. अखेर त्याच डिस्ट्रीब्युटर्सच्या दुस-या दुकानातून मी शेवटी "टु द लास्ट बुलेट" विकत घेतली.. त्यांच्याकडे मुळ इंग्रजी आवृत्ती उपलब्ध नसल्याने शेवटी नाईलाजास्तव मराठीत अनुवादीत पुस्तक खरेदी केली...
आता पुस्तकाविषयी.. "टु द लास्ट बुलेट" चं मुखपृष्ठच वाचकांना (व माझ्यासारख्या पुस्तकांवर भरभरुन प्रेम करणाऱ्या पुस्तकवेड्यांना) खुप आकर्षित करते.. शहीद IPS अशोक कामटेंचं वर्दीतील ते प्रभावशाली छायाचित्र व "टु द लास्ट बुलेट" च्या 'बु' ला छेदणाऱ्या बुलेट (गोळी)मूळे निघालेलं रक्त.. इतकच ते पुस्तक खरेदी करण्यास पुरेसं वाटतं.. यावरुनच आतल्या मजकुराची कल्पना येते (तशी 26/11 च्या प्रसंगाची कल्पना करवतही नाही..) व मलपृष्ठावर थोडक्यात 26/11, अशोक कामटे व या पुस्तकाविषयी माहिती दिलीय..
"टु द लास्ट बुलेट" ला 26/11 तच शहिद एटीएसचे प्रमुख IPS हेमंत करकरे यांच्या पत्नी सौ. कविताताईँची भावस्पर्शी प्रस्तावना आहे.. पुस्तकाच्या संभाषिका (Narrator) सौ. विनीता कामटेँनी हृदयस्पर्शी 'हृद्गत' व सहलेखिका म्हणून 'इंटेलिजन्ट पुणे' साप्ताहिकाच्या संपादिका सौ. विनीता विश्वास देशमुख यांचे मनोगत आहे... माझ्या मते तरी IPS हेमंत करकरे व IPS अशोक कामटे या जगातून कुठेही गेलेले नाहीत.. ते मृत झाले नाही तर त्यांनी देशासाठी वीरमरण पत्करलं.. ते शहीद हुतात्मे झाले.. आणि आपण नेहमीच मानतो.. "Mentors never die!"
पुस्तक सौ. देशमुख यांनी अशाप्रकारे लिहिली जणू सौ. कामटे ही कहाणी जगाला स्वत: सांगत आहेत.. ते सत्यही आहे.. तरी त्यांनी इतकं सहज लिहिलं कि त्यांनी कुठेही संवाद सांगणाऱ्या व्यतीरिक्त लेखिका म्हणून स्वत:चा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उल्लेखही येऊ दिला नाही.. होऊ शकतं याला एक कारण वा योगायोग हाही असावा की कहाणी सांगणाऱ्या व लिहिणाऱ्या दोन्ही लेखिका-सहलेखिका या 'विनीता'च आहेत... पुस्तकातील प्रकरणांविषयी लिहिण्यापुर्वी मला या पुस्तकाचे मराठीत भाषांतर करणारे अनुवादक श्री भगवान दातार यांच्या अनुवादनाची स्तुती केल्याशिवाय राहवत नाही.. कारण त्यांनी हे पुस्तक मराठीत अनुवादित केलं म्हणूनच नव्हे तर इतकं उत्तम अनुवादीत केलं की मला क्षणभरासाठीदेखील असं वाटलं नाही की सदर पुस्तकाची ही मुळ इंग्रजीतील प्रत नसून मराठीत भाषांतरीत आहे.. अगदी यथायोग्य पण तितक्याच तडफदार व आवश्यक तिथे भावस्पर्शी शब्दांचा वापर केलेला आहे.. किँबहूना मी असं म्हणण्यास हरकत नाही की मी आजवर वाचलेल्या कितीतरी मराठीत अनुवादीत पुस्तकांपैकी "टु द लास्ट बुलेट" हे सर्वोत्कृष्ठ मधलं एक आहे...
पुस्तकाच्या अंतरंगाविषयी "टु द लास्ट बुलेट"चे 'ती काळरात्र...' हे पहिलेच प्रकरण वाचत असताना 26/11चे ते भीषण चित्र माझ्या डोळ्यापुढे तरळत होतं.. अंगावरील काटे शहारुन निर्माण होऊ लागले होते व रोम-रोम जोशाने भरलं होतं.. कित्येक वेळा तर या एकाच प्रकरणात हुंदके देत रडायची देखील ईच्छा झाली..
'अखेरचा प्रवास' या दुसऱ्या प्रकरणातलं एक वाक्य मला उद्धृत करावासा वाटतो तो म्हणजे शहीद IPS अशोक कामटेंचा नोकरी (परिहार्याने) देशाभिमान-- "मला अपघातातला मृत्यु नको आहे. एखाद्या कामगिरीवर असताना मी आनंदानं मरणाला सामोरा जाईन..." 26/11/2008 रोजी त्यांनी तसंच भारतातील सर्वात मोठ्यातल्या एका कामगिरीवर असताना वीरमरण पत्करलं..
'राग, वेदना आणि निर्धार' मध्ये एका देशावर प्रेम करणाऱ्या, देशासाठी लढणाऱ्या व त्यातच मरण पत्करणाऱ्या एका शुर पतीविषयी एका वीरपत्नीचा अभिमान व प्रेम आपल्या लक्षात येईल...
'सत्य कोणी सांगेल का?' या चौथ्या प्रकरणात 26/11 हल्ल्यानंतर पोलिस प्रशासनाच्या कार्यवाही व कारवाई बाबत संभ्रमात पाडणारे असंख्य प्रश्न व त्यांची उत्तरे मिळवण्यासाठी एका वीरपत्नीचे धडाडीचे प्रयत्न व त्यांना मिळालेला विचित्र प्रतिसाद लक्षात येईल.. पण तीच वस्तुस्थिती आहे..
"का जवानांनी मिटले डोळे, आतंकाशी लढताना शेवटी मी श्रद्धांजली देतो, अमुच्या शहीदांना 2008 मध्ये अजरामल झाली 26 अकराची कहाणी"-RDH 'सत्याची उकल' या प्रकरणात जे व्यक्ती 26/11 च्या पोलिसी कारवाईबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत त्यांना संपुर्ण कारवाईचे चित्र समजेल.. 26/11 ला मुंबई पोलिसांनी केलेली कारवाई, शहीद IPS अधिकारी हेमंत करकरे व अशोक कामटे, शहीद मेजर संदिप उन्नीकृष्णन, शहीद पोलिस निरीक्षक विजय साळसकर, शशांक शिंदे, शहीद पोलिस उपनिरीक्षक प्रकाश मोरे, बापूसाहेब दुरूगडे, शहीद सहाय्यक पोलिस निरीक्षक तुकाराम ओंबळे, बाळासाहेब भोसले, शहीद पोलिस हवालदार एम. सी. चौधरी, शहीद NSG कमांडो गजेंद्र सिंग, शहीद पोलिस शिपाई जयवंत पाटील, विजय खांडेकर, अरूण चित्ते, योगेश पाटील, अंबादास पवार, शहीद SRPF शिपाई राहूल शिंदे आणि शहीद गृहरक्षा शिपाई मुकेश जाधव आणि अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखवलेली कार्यतत्परता, साहस व शौर्य तसेच देशासाठी दिलेलं बलिदान आणि मुख्य कंट्रोलरुमकडून झालेली दिरंगाई, टाळाटाळ व चुका या सर्व बाबी सत्य म्हणून वाचकांसमोर येतात... जर हे पुस्तक बाजारात आलं नसतं तर सामान्य माणसाला याविषयी काहिही सविस्तर कळलं नसतं.. या प्रकरणाने बरेच सत्य उकरुन काढले आणि निर्माण केले असंख्य प्रश्नसुद्धा!
पुढील प्रकरणात कळतं की "माहितीच्या अधिकाराचे शस्त्र" काय आहे.. पण मला एक प्रश्न पडतो की ही कसली व्यवस्था आहे आपल्या देशात की एका शहीद आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीला सुद्धा छोट्या-छोट्या बाबीतील सत्य शोधण्याकरिता या अधिकाराचा वापर करावा लागला..
'दंगली आणि चकमकी' या सातव्या प्रकरणात शहीद अशोक कामटे यांच्या कार्यशैलीची प्राथमिक ओळख होते...
मी बरीच पुस्तके वाचलीत पण एकच पुस्तक दररोज न चुकता वाचली असेल अशा फारच कमी अन् "टु द लास्ट बुलेट" हि त्यातलीच एक.. कारण एकच आता पुढे काय होतं हे जाणून घेण्याची उत्सुकता.. आपण सर्वांनीच 'नायक' चित्रपट पाहिला असेल.. त्या चित्रपटाचा नायक शिवाजी गायकवाड (अभिनेता अनिल कपूर) एक दिवस मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळतो.. 8 सप्टेँबर 2013 रोजी काही तास मला तसाच अनुभव आला.. मी ग्रॅज्युएट (पदवीधारक) होण्यापुर्वीच चक्क आयपीएस अधिकारी झालो होतो..! होय मी स्वत: सोलापूर, भंडारा आणि जिथे-जिथे शहीद अशोक कामटेँनी आयपीएस अधिकारी म्हणून ज्या-ज्या पदावर कामगिरी केली मी ते सर्व स्वत: अनुभवत होतो.. काही क्षणासाठी आयपीएस अशोक कामटेँच्या पात्रात स्वत:ला बघत होतो.. मग ते सोलापूरच्या गुंडांशी दोन हात करणं असो वा तेथील दंगली नियंत्रणात आणणं.. या प्रकरणात अशोक कामटेंच्या कार्यशैली व तेथील जनतेवर त्यांनी छोडलेली छाप अवर्णनीयच म्हणावी लागेल.. मी स्वत: मागील वर्षी मे 2012 मध्ये 'अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे' द्वारा आयोजित '19व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन' च्या निमित्ताने सोलापुरला जाउन आलो.. यावर्षी जुलै मध्ये मी मुंबईला पण जाऊन आलो.. तिथे तर हल्ला झालेल्या 'नरीमन पॉईँट' परिसरातील गेट वे ऑफ इंडीया जवळील 'होटल ताजमहल', 'होटल ट्रायडंट ओबेराय' परिसरात पर्यटक व जनतेची नेहमीसारखी आजही वर्दळ सुरुच असते.. इतका भीषण हल्ला सोसल्यानंतरही वरील दोन्ही होटल व स्वप्नांचं शहर 'आमची मुंबई' (मी मुंबईकर नसलो तरी) आन-बान-शानेनं जशीची तशी उभी आहे.. अगदी 26/11 ला काहीच न झाल्यासारखी.. स्वाभाविकच आता सुरक्षा यंत्रणाही काहिशी सावध झालीच असणार.. पण तितका भीषण हल्ला सोसूनही यत्किँचीतही न डगमगणाऱ्या मुंबईकरांना खरंच मनापासून सलाम!
गिरगाव चौपाटीवर आता 26/11 हल्ल्यात सहभागी अतिरेकी 'नरकीय' अजमल आमीर कसाब ला जीवंत पकडण्यासाठी वीरमरण पत्करणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षक शहीद तुकाराम गो. ओँबळे यांचे स्मारक तिथेच 'प्रेरणा स्थळ' म्हणून उभे आहे.. ते अगदी नावाप्रमाणेच देशप्रेमाची प्रेरणा देते.. स्वतंत्ररित्या या स्थळासंदर्भात लिहिनच कधीतरी... गेल्यावर्षी 21 नोव्हेँबरला 'कसाब'ला फाशीची शिक्षा झाल्यामुळे निश्चितच ओँबळे यांच्या आत्म्याला वाटले असेल कि त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही.. आणि या घटनेत मृत पावलेल्या सर्वाँच्या आत्म्याला शांती व त्यांच्या आप्त परिवाराला थोडासा दिलासा अवश्य मिळाला असेल..
पण खरं सांगतो अशोकजींच्या जाऊन चार-पाच वर्षे लोटल्यानंतर सुद्धा मला सोलापुर व मुंबईत तसं काही घडलं असेल असं मला क्षणभरदेखील जाणवलं नाही.. कामटे सरांनी तिथे प्रशासकीय व्यवस्थेची मुहूर्तमेढ रोवून ठेवलीय ती आजही अबाधित आहे.. याच प्रकरणात आयपीएस श्यामराव दीघावकर, संजय जाधव, विविध पोलिस, कर्नल संजय अनिशा आणि सुनिल सदरंगानी तसेच उद्योजक यतीन शहा यांनी कामटेँबद्दल सांगितलेल्या आठवणी आहेत...
नवव्या प्रकरणात 'भंडारा पोस्टीँग' मध्ये कामटे यांनी 'नक्षलवाद्यांवर प्रहार' कसा केला ते नमूद केलंय.. तसं पाहता तेव्हाच्या भंडारा जिल्ह्याचे 1 मे 1999 रोजी विभाजन होऊन गोँदिया जिल्ह्याची निर्मिती झालीय.. मी गोँदिया जिल्ह्याचाच.. आणि खरंतर राहण्याचं ठिकाण आमगाव सोडलं तर ज्या नक्षली क्षेत्रांची पुस्तकात नोँद आहे ते बहूतेक सर्वच आज गोँदिया जिल्ह्यात मोडतात.. मग देवरी व अर्जुनी मोरगाव हे तालुके असोत वा नवेगावबांध व नागझिरा अभयारण्य ही पर्यटन स्थळे..! सौ. विनिता कामटे यांनी स्वत:चे भंडाऱ्याचे खुप ग्रामीण किँवा मागासलेलं क्षेत्र/जिल्हा असं वर्णन केलं आहे.. त्यांनी केलेलं वर्णन वाचून मला हसु येत होतं.. कारण खरंच हे क्षेत्र पुर्वी तसच राहीलं असावं.. मात्र आज परिस्थिती थोडी बदललीय.. विदर्भातील भंडारा व गोँदिया हे दोन्ही नक्षलग्रस्त जिल्हे झपाट्याने विकास करताहेत.. हं मात्र नक्षली प्रश्न आहे तो अगदी तसाच.. हं भीतीचं कारण आताही असलं तरी पुर्वीसारखा नाही.. आमच्याच चाळीत एक आमगाव पोलिस स्थानकात कार्यरत पोलिस हवालदार गणेश शेँडे राहतात.. त्यांनी पण IPS अशोक कामटेँच्या कारकिर्दीतील बहुतेक किस्से सांगितले.. "एक धिप्पाड, कुणाला न घाबरणारे व सर्व गुंडांवर जरब बसवणारे पोलिस अधिकारी म्हणून.. ते बाहेर आले की कुणी गुंड तर सोडा साधा मवाली देखील शर्टाची बटन खुली ठेवत नसे.. मग कॉलर तर सोडाच.." या प्रकरणात आयपीएस श्री पद्मनाभन यांनी सांगितलेली आठवण दिलीय..
दहाव्या प्रकरणात चि. अशोक व कु. विनिता यांच्या पहिल्या भेटीच्या प्रसंगापासून तर लग्नापर्यँतची प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट तितक्याच प्रेमानं नमूद केलीय.. ज्यावरुन कणखर पोलिस अधिकाऱ्यातील प्रेमळ पतीचं दर्शन होतं..
गणेश चतुर्थीच्या दिवशी 9 सप्टेँबरला सकाळी साडेसात पासून वाचन सुरु केल्यानंतर दहा-साडेदहा पर्यँत केव्हा "टु द लास्ट बुलेट"ची संपुर्ण 231 पाने वाचुन झाली काही कळलेच नाही.. 'सुखद सातारा' या प्रकरणात सातारा जिल्ह्यातील नयनरम्य हवामानाचं वर्णन वाचून स्वत:च पर्यटन केल्यासारखं वाटतं..
आयपीएस विनीत अगरवाल यांनी सांगितलेल्या अनुभवांनंतर शहीद अशोक कामटेँचे आदर्श आजोबा स्वातंत्र्योत्तर काळातील मुंबईचे पहिले इंस्पेक्टर जनरल (IG) स्व. IPS नारायणराव मारुतीराव कामटे यांच्या कारकिर्दीविषयी त्यांनी त्यांच्या "From Them To Us" या आत्मचरित्रात सांगितलेले अनुभव उद्धृत केलेले आहेत.. यावरुन कळतं कि प्रशासकीय कार्य हा अशोकजीँना कामटे 'घराण्याचा वारसा' म्हणूनच मिळाला होता की काय जणू... या प्रकरणात अशोकजीँच्या पणजोबा मारुतीराव, आजोबा नारायणराव व वडील लेफ्टनंट कर्नल मारुतीराव कामटे तसेच त्यांच्या आईचे वडील डॉ. एच. एस. बावा यांचा थोडक्यात परिचय करुन दिलाय..
'सांगली पोस्टीँग' मध्ये अशोक कामटे कसे 'बेडर अधिकारी' होते ते दिसून येते..
'बोस्निया पोस्टीँग' मध्ये अशोकजीँची 'परदेशातील कामगिरी' व्यक्त केलीय..
पंधराव्या प्रकरणात आपल्याला कळतं की अशोकजींसाठी 'खेळ ही उर्मी आणि फिटनेस हा ध्यास' होता.. खेळ, फिटनेस आणि वेळेचं त्यांच्या आयुष्यात काय महत्त्व होतं! IPS अशोक कामटे कसे तल्लख बुद्धीचे अभ्यासू विद्यार्थी व सर्वच खेळात प्राविण्यप्राप्त खेळाडू होते..
पुढील प्रकरणात त्यांच्या कुटूंब व मित्रांविषयी वर्णन केलंय की इतके मोठे अधिकारी असूनही ते कसे मनमिळाऊ मित्र होते.. पुढे लुईस मांटा, योशियुकी फुजिशिमा, डग्लस कुडिन्हो व आताचे मुंबई सायबर क्राईम गुन्हे शाखेचे जॉईन्ट कमिशनर ऑफ पोलिस आयपीस श्री हिमांशु रॉय यांनी अशोकजी सोबतच्या मैत्रीचे किस्से सांगितलेत...
'शस्त्रनिपुण' या प्रकरणात वाचकांना कळून चूकतं की नानाविध प्रकारच्या शस्त्रांबद्दल ज्ञान व कुतूहल आणि ती शस्त्रे हाताळण्यात ते किती कुशल होते... अशोकजींचं शस्त्रांवरील प्रेम! तसंही पहिल्याच प्रकरणात आपल्या वाचनात येतं की आयपीएस फ्रान्सिस अरान्हा (जे अशोक कामटेँच्या नोकरीतील पहिले पोलिस अधिक्षक/SP होते) यांनी योगायोगाने 26/11/2008 रोजीच त्यांना विचारलं होतं- "तुझा देवावर विश्वास आहे?" त्यावर IPS अशोक कामटेंचं उत्तर होतं- "नाही! माझा फक्त शस्त्रपुजेवर विश्वास आहे." तरी या प्रकरणात प्रा. डॉ. दीपक राव यांनी अशोक कामटेँच्या शस्त्र नैपुण्याबद्दल विशेषत्वानं लिहून ठेवलय..
अठराव्या प्रकरणात अशोक कामटे यांचे जीवलग मित्र कॉनराड लिओ यांनी अशोकजीँच्या वीरमरणानंतर त्यांच्या मुलांना (राहूल व अर्जून) लिहिलेलं भावस्पर्शी पत्र दिलेला आहे..
आणि शेवटच्या एकोणिसाव्या प्रकरणात लेखिका सौ. विनिता अशोक कामटे यांनी लिहून ठेवलंय कि इतक्या साऱ्या दु:खद घटनांनंतर आता 'नवा दिवस-नवं स्वप्न' कसा रंगवायचाय.. सरतेशेवटी शहीद IPS अशोक एम. कामटेँचा जीवनपट दर्शवलाय व सोबतच त्यांचे काही रंगीत छायाचित्रदेखील...
मी जाणतो "टु द लास्ट बुलेट"चं समिक्षण जरा जास्तच लांबलंय.. आणि आता आपणास कदाचित वाटत असेल की मी या "अमेय प्रकाशनाद्वारे" प्रकाशित पुस्तकाला रेटीँग देईन पण नाही.. मी कोणी खुप मोठा समिक्षक नसल्याने तसं करणार नाही.. आणि 26/11 वरील या पुस्तकाला रेटीँग देण्याइतपत मी स्वत:ला पात्रही समजत नाही.. कारण "टु द लास्ट बुलेट" हे फक्त पुस्तक नसून भारतातील प्रशासकीय यंत्रणा, तिची कार्यवाही.. 26/11 ची ती भयानक घटना.. ती हाताळण्यात झालेल्या चुका व सजगता.. सत्यता.. इतिहास.. आणि एका कर्तव्यदक्ष पोलिस (शिपायापासून तर अधिकाऱ्यापर्यँत) यांच्या वैयक्तिक, पारिवारीक, सामाजिक आणि प्रशासकीय कारकीर्दीची प्रेरणादायी अमरकहाणी आहे... जी आज 26/11 च्या घटनेला पाच वर्षे होत असताना मी जर काही करु शकत असेन तर फक्त त्यांना नतमस्तक होऊन सन्मानपुर्वक फक्त SALUTE/सलाम ठोकू शकतो..
आणि सरतेशेवटी 26/11 वर आधारीत माझ्या स्वरचित दोन मराठी कविता देतो- 26/11ची कहाणी
या भारत देशामधलीऽऽऽ या भारत देशामधली, आतंकाची वाणी आतंकवादी होते सगळे, सगळे पाकिस्तानी॥धृ.॥
ताज उडवला, आम्हा समजली, आतंकाची भाषा आम्हा कळली, यांना समजते, फक्त आतंकाची भाषा मुंबईमध्ये वाहू लागला, लोट फक्त रक्तानी ॥1॥
या हल्ल्याची, तारिख होती 26 अकरा 26 अकरा ला झाला, फक्त शस्त्रांचा मारा देशासाठी जीव ओतीला, अमुच्या शहिदांनी॥2॥
सा-या जगाने निषेध केला, आतंकवादी हल्ल्याचा हल्ल्यामध्ये वापर झाला, गोळीबार आणि ग्रेनेडचा आणि एकदा पुन्हा हादरली, मुंबई बाँबस्फोटांनी॥3॥
का जवानांनी मिटले डोळे, आतंकाशी लढताना? शेवटी मी श्रद्धांजली देतो, अमुच्या शहीदांना 2008 मध्ये अजरामर झाली, 26 अकराची कहाणी॥4॥
कवी- राजेश डी. हजारे (RDH)
26 नोव्हेँबर 2008
'26 नोव्हेँबर 2008.' मुंबईनं केला होता नेहमीसारखा थाट; काळ बघत होता काळ्या रात्रीची वाट; मुंबईकरांनी संघर्ष केला एकूण घंटे साठ;
प्रथम निषाण बनली 'सीएसटी' वरची कार; आणि नंतर सुरू झाला सलग गोळीबार;
मुंबईनं केला होता नेहमीसारखा साज; आतंकाचा निषाण बनला प्रसिद्ध 'होटल ताज';
हल्ल्यामध्ये शहीद झाले एकूण वीसच्या वर; हेमंत करकरे, अशोक कामटे, संदीप उन्नीकृष्णन व विजय सालस्कर;
हल्ल्यामध्ये जीव गमावला जवळपास दोनशे नागरीकांनी; आणि सर्व आतंकवादी होते फक्त पाकिस्तानी;
शहिदांनी दिली देशासाठी प्राणांची आहूती; आणि मिळवली पुन्हा एकदा शौर्याची पावती;
'ताज होटल', 'नरीमन हाऊस' आणि 'होटल ओबेराय'; सा-या जगाने निषेध केला 'आतंकवाद-हाय! हाय!'
आज आतंकवाद मिटवण्याची अखेर वेळ आली. मुंबई बाँबस्फोटातील शहीदांना 'आरडीएच' ची भावपुर्ण श्रद्धांजली...!
कवी- राजेश डी. हजारे (RDH)
जय हिँद..!
पुस्तक- TO THE LAST BULLET (टु द लास्ट बुलेट) लेखिका- विनिता कामटे सहलेखिका- विनिता देशमुख मराठी अनुवाद- भगवान दातार पाने- 231 मुल्य- ₹192 प्रकाशन- अमेय प्रकाशन, पुणे समिक्षक:- राजेश डी. हजारे (RDH)
भ्रमणध्वनी क्र.- 07588887401 Email- www.rdh@gmail.com (समिक्षक 'अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे' गोँदिया जिल्हा शाखेचे 'गोँदिया जिल्हाध्यक्ष' आहेत.)
#BooksIRead - Vinita's love & admiration for her husband #AshokKamte is aptly reflected in the contents of this book. Very inspiring to know of Ashok's conduct & professionalism in the line-of-duty. My humble salutations to this great hero! Vinita Deshmukh's lucid language paints a beautiful picture of this great hero. Special tnx to the authors - #VinitaKamte & #VinitaDeshmukh for bringing this book to us. #BigFan
This book is very inspirational for the youngsters i salute Mr ASHOK KAMTE for his sacrifice for the nation and i thank VINITA KAMTE and VINITA DESHMUKH for bringing this book to us.
Happy that I was able to get this book via a second hand vendor. The first five to six chapters of this book describes about the ghastly night of 26/11. Our hero Late Ashok Kamte who shot Qasab, sad it took Mrs Kamate persistent to get the truth out else many events that happened that night would have swept under the carpet. The remaining chapters of the books is all about our hero Ashok's journey via several posting including in Naxal infested areas. He is still a hero in Solapur and people should read that chapter to know how a honest cop can bring about a change in the system. In our current educational system this book is highly recommended so that kids would know who is the real hero that they should emulate.
Inspiring Story of Honest Police Officer., Must Read those who looking for Motivation.
In case if you are looking for more details on 26/11 well its disappointing one. Since its more focused on 26/11 (few hours) and Vinita the spouse of Late Ashok Kamte reactions and her investigation to find what exactly happen to her husband and their personal/friendship with officers etc....
I loved the book.this is must read book atleast after hearing survival stories i felt i must read this book & there is lot of thing which will make u realise that discussing the accidents & people going through them there is huge difference.Kudos to the writer ,i really admire her now
I began to read book for understanding life of IPS officers and completely blown by this mans achievements ! Found it really engaging ,lots of lessons to learn from Ashok sir :)
began this book with the expectation of learning more about the life of an IPS officer. The book did a good job of delivering it, but somewhere in the middle, I noticed that the author was overcome with emotion, and she not only dived deeper into her husband's life, but she also discussed her husband's father's and grandfather's civil service careers. An essay may be written in the form of an emotional pendown, and I felt it a little stretched. Otherwise, it's an enjoyable read. I give it a three-star rating.
This book in the story of Late Ashok Kamte, Indian Police Service officer, who bravely fought against the perpetrators of 26/11 terror attack in Mumbai.
The book outlines the events of the tragic attack and the role Mr. Kamte played in the chain of these events. It also sheds light on the past life of Mr. Kamte, his formative years and his rise as a police officer.
The book makes you feel for the working conditions of Indian Police Services officers, as well as highlights the lacunae in the system which further exacerbate these difficult working conditions. It makes for an inspiring reading.
The book is authored by the wife of Mr. Kamte, and it is hard to miss the personal touches and the sense of loss.
I respect Vinita's search for truth and absolutely agree that telling the story of her husband was important so that Indian's know the story of Ashok Kamte. I have no words to express my deepest sympathy to the family who lost such an enlightened soul. Ashok Kamte was a true Hero and will be an inspiration to Millions of Indians who will read his story.
The book unveils the Police Action of 26/11, A tragic night for all Mumbaikars- This is a biography of Martyr Shri Ashok Kamate who sacrificed His Life while fighting hard against the Terrorists. Salute to Mrs. Vinita Kamate too who, leaving aside all her grief, showed the courage to tell the story of Her Brave heart Husband... Definitely a Heart Touching and inspiring story....
The book offers a vivid insight into the life of Ashok Kamte,IPS and is a treat for those aspiring to become an IPS officer.Its impactful narration of events left my eyes moist at several instances and gave me goosebumps at several others.The book can also be classified as a motivational one which will enable many to find a sense of purpose in their lives.
My article about the book written by Vinita Kamte (Wife of ACP Ashok Kamte), which raised questions about negligence of higher authorities in Mumbai police on 26/11 attacks by LeT terrorists.