ह्या पुस्तकात लेखकाने पन्हाळ्याच्या वेढ्यातून महाराजांना सुखरूप विशाळगडावर पोहोचवण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सैन्याने गजापूरच्या घाटीत दिलेल्या प्राणांच्या बलिदानाची कथा लेखकाने अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडली आहे.
पुस्तकाचे विशेष म्हणजे केवळ ऐकीव कथा न सांगता, भौगोलिक स्थळांचा, ऐतिहासिक संदर्भांचा आणि त्या काळातील military strategies चा सखोल अभ्यास यात केलेला दिसतो. हे पुस्तक फक्त मराठ्यांचाच नाही तर विजापूरी दरबाराची देखील तत्कालीन परीस्थिती स्पष्टपणे मांडते.
आणखी जास्त नकाशे किंवा चित्रे असती तर वाचनानुभव अधिक समृद्ध झाला असता असं मला वाटतं.