भारतातील सात,इंग्लंड - अमेरिकेतील सात आणि पाकिस्तानातील एक अशा एकूण 15 इंग्रजी दैनिकांची/नियतकालिकांची ओळख करून देणारी लेखमाला, तब्बल 65 वर्षे पत्रकारिता व लेखन वाचनात घालवलेल्या गोविंदराव तळवलकर यांनी 2011 मध्ये साधना साप्ताहिकात लिहिली होती, त्या सर्व लेखांचे हे पुस्तक आहे.
आजकाल आपल्या प्रसारमाध्यमांनी अमेरिकन टीव्हीचा उथळपणा आत्मसात केला आहे आणि त्यांच्याशी स्पर्धा करण्याच्या भरात, काही अपवाद वगळल्यास अनेक वृत्तपत्रांनी करमणूक हे उद्दिष्ट ठेवले आहे.
या पार्श्वभूमीवर, विचारांना चालना देणारी गंभीर स्वरूपाच्या इंग्रजी दैनिकांची-नियतकालिकांची ओळख करून देणारी लेखमाला सुरू करण्याची सूचना साधना साप्ताहिकाच्या संपादकांनी केली.