या लेखिकेचं वाचनात आलेलं हे माझं पहिलंच पुस्तक. पण आता हे पुस्तक वाचून झाल्यानंतर त्यांनी लहिलेल्या पुस्तकांची यादी मी काढून ठेवली आहे, कारण कावेरीच्या आयुष्यातले पाऱ्यासाखे होणारे चढ-उतार हे मला मनापासून भिडले. अनेकदा एखादं वाक्य वाचून, मी काही वेळ पुस्तक बंद करून, त्याबद्दल विचार करत असे. जन्म आणि मृत्यू यामधला प्रवास हा खूप मोठा वाटतो आपल्याला, पण ते असतं मुळात "एका श्वासाचं अंतर".