THE NUMBER ONE BESTSELLING MEMOIR, SET TO TOP THE CHARTS ONCE MORE IN PAPERBACK...मी माझा शाळेचा फोटो आईला दिला. तिने माझ्या फोटोकडे नीट निरखून पाहिले. नंतर माझ्याकडेही बारकाईने पाहिले. ''देवाऽ, ही कार्टी इतकी कुरूप कशी जन्माला आली? अरे देवा, किती कुरूप आहे ही... कुरूप. कुरूप.'` क्रूर, विद्ध करणारे हे शब्द ही केवळ सुरुवात आहे. कॉन्स्टन्सच्या आईने अतिशय पद्धतशीरपणे, कायम आपल्या मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. सततची मारझोड आणि उपासमार ह्यामुळे पराकोटीची निराश होऊन तिने शेवटी सामाजिक सेवाभावी संस्थेमध्ये आश्रय घेण्याचाही प्रयत्न करून पाहिला. तिला अक्षरश वाऱ्यावर सोडून तिची आई चक्क दुसरीकडे राहायला निघून गेली. घरात गॅस नाही, वीज नाही, खायला अन्न नाही अशा बिकट परिस्थितीशी मुकाबला करीत कॉन्स्टन्सने दिवस काढले. सुरुवातीच्या अत्यंत यातनामय जीवनाला कॉन्स्टन्सने कमालीच्या धैर्याने तोंड दिले. कॉन्स्टन्सच्या हृदयद्रावक - आणि यशस्वी - जीवनसंग्रामाची ही कथा.
Constance Briscoe (born 18 May 1957) is a former barrister, and formerly one of the first black female recorders in England and Wales. In May 2014, she was jailed for three counts of doing an act tending to pervert the course of justice in R v Huhne and Pryce.