मराठी पुस्तक-प्रेमी (Marathi Book Lovers) discussion
पुस्तकप्रेमी-गप्पा | Group talk
>
एखादं दुर्मिळ पुस्तक जे तुम्हाला वाचायचं आहे? (Name a book which is rare & you want to read?)
date
newest »
newest »
message 1:
by
अनिकेत
(new)
Apr 28, 2025 10:16PM
Mod
reply
|
flag
मला ही पुस्तकं वाचायची आहेत, कोणाकडे असेल तर सांगा-
अशोक व्हटकर - विद्यावाचस्पती
अशोक कामत - सिक्ख धर्माचा इतिहास
नंदा खरे- समग्र बालकवी (Popular Prakashan)
अशोक व्हटकर - विद्यावाचस्पती
अशोक कामत - सिक्ख धर्माचा इतिहास
नंदा खरे- समग्र बालकवी (Popular Prakashan)
ट्रिनिटी'ज चाईल्ड - मूळ लेखक - विल्यम पोर्शनाव, अनुवाद - अनिल काळेही दुसऱ्या महायुद्धातील एक कथा आहे. युद्धाच्या धुमश्चक्रीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष गायब होतात. ते मरण पावले आहेत असं समजून त्यांच्या डेप्युटीला राष्ट्राध्यक्ष केलं जातं. तो युद्धपिपासू निघतो आणि थेट अणुहल्ल्याची आज्ञा देतो. एका लढाऊ विमानाच्या चमूवर ही कामगिरी सोपवली जाते. वास्तविक नवा राष्ट्राध्यक्ष वैयक्तिक कारणांसाठी युद्ध छेडत असतो. अशा वेळी त्याच्या हाताखालील अधिकारी काय निर्णय घेतात, लढाऊ विमानाचे सैनिक खरंच अणुबॉम्ब फेकतात का, जुने राष्ट्राध्यक्ष कुठे असतात असे अनेक प्रश्न शेवटी सुटतात. त्यासाठी अनेकांचे बळी जातात. कथानकात अनेक चढ-उतार येतात. अनेक चित्तथरारक प्रसंग येतात.
खूप वर्षांपूर्वी ही कादंबरी ग्रंथालयातून घेऊन वाचली होती. पुन्हा वाचायची इच्छा आहे, पण सध्या कुठेही उपलब्ध नाही. मी थेट अनुवादक अनिल काळे यांच्याकडेही चौकशी केली होती. त्यांच्याकडेही कॉपी उपलब्ध नाही. पुण्यात अनेक दुकानांमध्ये शोधलं. अजून सापडलेलं नाही.


