Goodreads helps you follow your favorite authors. Be the first to learn about new releases!
Start by following Sant Gyaneshwar.
Showing 1-30 of 36
“पहा, अशा रितीने होणाऱ्या बऱ्यावाईट कर्माच्या ठिकाणी जी चित्ताची समता, याचीच सज्जन लोक योगस्थिती म्हणून प्रशंसा करतात. ।।२७२”
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)

“योगः कर्मसु कौशलम्” ही योगाची व्याख्या नसून योगात कर्माचे बंधकत्व नाहीसे करण्याचे कौशल्य आहे, एवढेच दाखविले आहे.”
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“गूढार्थदीपिका—परी उपास्ति ते योग्यते- । आधीन असे”
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“संतवचनाने चित्त निर्भय होते व जीव परब्रह्मासारखाच निःसंशय होतो.”
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“येथे अज्ञानी असो की ज्ञानी असो, प्रत्येक पुरुष कर्म करीतच असतो. तो क्षणभरही कर्मरहित राहू शकत नाही असे सांगितले नसून प्रकृतीच्या स्वाधीन असलेला म्हणजे मी प्रकृतीहून निराळा आहे, असे आपल्याला न जाणणारा असा अज्ञानी पुरुषच क्षणभरदेखील कर्मरहित राहू शकत नाही, असे सांगितले आहे. ज्ञानी पुरुष आपल्याला जड प्रकृतीहून व कर्माहून निराळे पाहातो, म्हणून तो (ज्ञानी पुरुष) आपल्याला मी ज्ञानस्वरूप असून जड अशा प्रकृतीहून व कर्माहून निराळा आहे असे साक्षात जाणत असल्यामुळे, त्याच्या ठिकाणी प्रकृतीनुसार कर्म होत असले तरी तो त्या कर्माशी व त्या कर्माच्या कर्तृत्वाशी मुळीच संबंध वागवीत नाही.”
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“जंववरी अर्जुना । तो बोध भेटेना मना । तंवचि या साधना । भजावें लागे ।।१४९”
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा । निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ।।३०।।”
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“अर्जुना! जोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान होत नाही, तोपर्यंतच या साधनरूप कर्मयोगाचे अनुष्ठान करायचे असते. ”
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“ज्याप्रमाणे पाण्यातील कमळाच्या पानाला पाणी लागत नाही, त्याप्रमाणे तो कर्मांत अलिप्त असतो. ”
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“म्हणून एका अद्वैत वस्तूच्या ठिकाणी द्वैत पाहतात.”
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“मग अपेक्षित जें आपुलें । तेंही सांगतील पुसिलें । जेणें अंतःकरण बोधलें । संकल्पा न ये ।।१६८।।”
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन । निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ।।४५।।”
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः । त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ।।९।।”
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः । स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् ।।१८।।”
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“जो योगयुक्त पुरुष तत्त्वज्ञानी होतो, त्याच्या ठिकाणी मी कर्म करतो अशी कर्तृत्वबुद्धी कधीच उठत नसते. तो आपल्याला कर्मरहित केवळ चैतन्यस्वरूप पाहतो. लोकांना तो पाहतो, ऐकतो, स्पर्श करतो, वास घेतो, खातो, जातो, निजतो, श्वासोच्छ्वास करतो, ।।८।। बोलतो, मलमूत्र-विसर्ग करतो, डोळ्यांची उघडझाप करतो, असे दिसते, पण तो मात्र इंद्रिये आपआपल्या विषयाचा व्यापार करीत आहेत, त्यांच्याशी माझा (आत्मस्वरूपाचा) काही एक संबंध नाही, असे अंतःकरणात धारण करतो व मी त्याच्याहून निराळा आहे असे समजतो. ।।”
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“ज्याच्या पोटात अमृताचा झरा आहे किंवा ज्याच्या पोटात अमृत स्रवते, त्याला जसे भूक, तहान यांचे दुःख कधीच होणे शक्य नाही, ”
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“येऱ्हवीं तरी पाहीं । जे जैसे माझ्या ठायीं । भजती तयां मीही । तैसाचि भजें ।।६६।।”
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“आणि मी माझें ऐसी आठवण । विसरलें जयाचें अंतःकरण । पार्था तो संन्यासी जाण । निरंतर ।।२०।।”
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये स्वाधीन असून त्याच्या इच्छेप्रमाणे वागतात, त्याची बुद्धी स्थिर झाली, असे समज. ।”
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“मार्ग तरी दोनी । परी एकवटती निदानीं । जैसी सिद्धसाध्यभोजनीं । तृप्ति एक ।।३८।।”
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“आपल्याला उचित म्हणून सांगितलेला स्वधर्मच आचरत असता, जे सुखदुःख येईल ते निवांत अंतःकरणाने सहन करावे. ।।२२८”
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन । बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम् ।।४१।।”
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“स्वधर्माप्रमाणे आचरण करावे, पण धर्माप्रमाणे वागले असता जे फळ प्राप्त होते म्हणून सांगितले असेल, त्या फळाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा मात्र धरू नये. ज्याप्रमाणे”
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“देहसंगें तरी असे । परी चैतन्यासारिखा दिसे”
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“जे बुद्धियोगा योजिले । तेचि पारंगत जाहले । इहीं उभयसंबंधी सांडिले । पापपुण्यीं ।।२७७।।”
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“अर्जुना समत्व चित्ताचें । तेंचि सार जाण योगाचें । जेथ मन आणि बुद्धीचें । ऐक्य आथि ।।२७३।।”
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“विषयसुखाच्या प्राप्तीची कामना सोडून स्वधर्म हा परमेश्वराची आज्ञा आहे, ती पाळायची म्हणून केलेल्या स्वधर्माचरणाने विषयवैराग्य अंगी बाणते व भगवंताकडे चित्ताचा ओढा लागुन चित्त अध्यात्माचा विचार करू लागते, विषयवैराग्य उत्पन्न होणे व अध्यात्मप्रवण मन होणे यालाच शास्त्रात चित्तशुद्धी असे नाव दिले आहे.”
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहाली । तर्काची दृष्टी गेली । जेणें इंद्रियें विसरलीं । विषयसंग ।।१६२।। मनाचें मनपण गेलें । जेथ बोलावें बोलकेपण ठेलें । जयामाजि सांपडलें । ज्ञेय दिसे ।।१६३।। जेथ वैराग्याचा पांग फिटे । विवेकाचाही सोस तुटे । जेथ न पाहतां सहज भेटे । आपणपें ।।१६४।।”
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“कर्म करीत असताना ते कर्म मी करतो असा अभिमान जो धारण करीत नाही व त्या कर्माच्या फळाचीही इच्छा सोडतो, तो खरा योगी होय.”
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
― Gyaneshwari Gudartha Dipika, Code 0784, Marathi, Gita Press Gorakhpur (Official)
“मनोवृत्तिरूप विशेषभावाचेच प्रकार आहेत. या मनोवृत्तिरूप विशेषभावांशी जीव आपले नेहमी ऐक्य करीत व मी सुखी, मी दुःखी, माझा लाभ, माझी हानी, माझा जय, माझा पराजय असे म्हणत ‘मी मी’ म्हणून स्फुरत असतो. किंवा अशा विशेषभावाने आपली काही कल्पना करीत ‘मी’ म्हणून स्फुरणे हेच जीवदशेचे स्वरूप”