Goodreads helps you follow your favorite authors. Be the first to learn about new releases!
Start by following विंदा करंदीकर.
Showing 1-1 of 1
“चुकली दिशा तरीही हुकलें न श्रेय सारें;
वेद्या मुशाफ़िराला सामील सर्व तारे.
मी चालतों अखंड चालायचें म्हणून;
धुंदींत या गतीच्या सारेच पंथ प्यारे.
डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे;
हें शीड तोडलें कीं अनुकूल सर्व वारे!
मग्रूर प्राक्तनाचा मीं फ़ाडला नकाशा;
विझले तिथेंच सारे ते मागचे इशारे.
चुकली दिशा तरीही आकाश एक आहे,
हें जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे.
आशा तशी निराशा, हें श्रेय सावधांचें;
बेसावधास कैसे डसणारे हे निखारे.”
―
वेद्या मुशाफ़िराला सामील सर्व तारे.
मी चालतों अखंड चालायचें म्हणून;
धुंदींत या गतीच्या सारेच पंथ प्यारे.
डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे;
हें शीड तोडलें कीं अनुकूल सर्व वारे!
मग्रूर प्राक्तनाचा मीं फ़ाडला नकाशा;
विझले तिथेंच सारे ते मागचे इशारे.
चुकली दिशा तरीही आकाश एक आहे,
हें जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे.
आशा तशी निराशा, हें श्रेय सावधांचें;
बेसावधास कैसे डसणारे हे निखारे.”
―