Keerti Parchure
“अपयशांमधून मिळणाऱ्या शिकवणीवर एडिसनचा गाढ विश्वास होता. कोणताही प्रयत्न अपयशी झाला, तरी त्यातून पुढच्या प्रयत्नासाठी काहीतरी धडा मिळतोच, असं त्याचं ठाम मत होतं.”
― Thomas Alva Edison (Bhannat manasa)
― Thomas Alva Edison (Bhannat manasa)
“कार्बन बटनमुळेच हे यंत्र वापरण्याजोगं झालं असल्याचं शिक्कामोर्तब कोर्टानेही केलं. त्यामुळे आज सगळं जग ग्रॅहम बेलला टेलिफोनचा जनक म्हणून ओळखत असलं, तरी त्या टेलिफोनच्या अस्तित्वाचं महत्त्वाचं श्रेय एडिसनचं आहे.”
― Thomas Alva Edison (Bhannat manasa)
― Thomas Alva Edison (Bhannat manasa)
“युद्ध सुरू झालं, त्या वेळी एडिसन सत्तरीच्या जवळ होता, तरी त्याचे कामाचे तास कमी झाले नव्हते. तो तेव्हाही रोज १६ तास काम करायचा. त्याला विश्रांतीचा किंवा झोपेचा तिटकारा होता. ‘आठ ते दहा तासांची झोप घेणारे लोक कधीच पूर्ण जागे किंवा गाढ झोपलेले नसतात.’ असं त्याचं ठाम मत होतं. एडिसन म्हणायचा, ‘‘मला अगदी थोडी झोप पुरते. मला कधीच स्वप्नं पडत नाहीत. जर चुकून कधी जास्त झोपलो, तर आळसावल्यासारखं वाटतं. थोडी जरी कमी झोप झाली, तरी लोक खूप मोठं नुकसान झाल्यासारखे बोलत असतात. नुकसान झालेलं असतंच, पण ते संधीचं आणि वेळेचं झालेलं असतं, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी एकदा उत्सुकतेने ब्रिटिश मेडिकल जर्नलचा पूर्ण अभ्यास केला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की, कमी झोपेमुळे कुणालाही गंभीर आजार वगैरे होत नाहीत.”
― Thomas Alva Edison (Bhannat manasa)
― Thomas Alva Edison (Bhannat manasa)
Is this you? Let us know. If not, help out and invite Keerti to Goodreads.

