अनिकेत अनिकेत’s Comments (group member since Mar 31, 2015)



Showing 1-20 of 54
« previous 1 3

86477 वेळ- सकाळी ११-१२
स्थळ- संभाजी उद्यान, (कुणाला वेगळं सुचवायचं असल्यास सांगा)
86477 Thanks Shubhangi,
if you are able to address other requests, pls help on those too
Thanks !
86477 पुणे, स्थळ,वेळ काही दिवसांनी इथे टाकली जाईल
86477 ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा येथील शाहू स्टेडियम वर ०२ ते ०४ जानेवारी २०२६ दरम्यान पार पडणार आहे. रसिक वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
86477 या समुहाची १ली भेट रवि. १८ जानेवारी रोजी ठरवायचा विचार करत आहे, तरी समुहातील सदस्यांनी आपलं मत व उपलब्धता या संभाषणाला प्रतिसाद म्हणून १५ जानेवारी पर्यंत नोंदवावी ही विनंती ! भेटीचे ठिकाण व वेळ लवकरच या संदेशावर कळवले जाईल.
86477 ओंकाराच्या आदिम नादापासून निर्माण झालेला स्वर माणसाने कंठस्थ केला, साचेबद्ध केला. यातुन निर्माण झालं शास्त्रीय संगीत. हिंदुस्थानी असो कि कर्नाटकी, दोन्ही भारतीय शास्त्रीय संगीताच्या मुख्य शाखा आहेत.समजायला थोडं अवघड असेल म्हणुन किंवा आधुनिक संगीताचा पगडा म्हणुन सामान्य माणसाला ते फारसं भावलं नाही."नादवेध" च्या निमित्ताने लेखक द्वयीनी या विषयाची अभ्यासपुर्ण व सोप्या शब्दात मांडणी वाचकांसमोर ठेवली आहे.

मुख्यतः "हिंदुस्थानी"तील जवळपास ७० रागांची दुपानी लेखांतुन माहिती असल्याने, पुस्तक वाचताना खुप रेंगाळल्यासारखं होत नाही. शिवाय प्रत्येक राग, त्याचे विशेष,लोकप्रिय हिन्दी/मराठी चित्रपट,नाट्यगीतांची उदाहरणं देऊन हलक्याफुलक्या पद्धतीने समजावला आहे.त्यामुळे माहिती वाचताना वाचकाला हरवल्यासारखं होत नाही.

स्वतःचा संगीतप्रवास,रागांची ओळख व स्वभाव,त्यावर बेतलेली प्रसिद्ध गाणी,गीतकार,संगीतकार,गायकांचे किस्से/आठवणी, त्याला अनुरूप कवितांच्या ओळी असा रंजक "नादवेध" यात आहे. गानरसिकांसाठी तर हा माहितीचा अद्भुत खजिनाच ठरणार असुन शास्त्रीय संगीताबद्दल जाणुन घेण्याची इच्छा असणाऱ्यानाही या पुस्तकाची बरीच मदत होईल हे सांगणे न लगे !

आणि हो ! परिशिष्ट नक्कीच विशेष आहे, तेव्हा भविष्यात संदर्भासाठी संग्राह्य असेच पुस्तक आहे.
86477 Prathamesh wrote: "Hi im Prathamesh, Software Engineer from Pune. I have started reading this year and it has been a wonderful journey.

Apart from books I like to go on weekend rides, watch movies and listen to musi..."

सुस्वागतम प्रथमेश !तुझ्या इतर मित्रांनाही समुहात सामील कर.
86477 Dnyaneshwar wrote: "Hi i am dnyaneshwar . i am a neet aspirant studying and reading books ."
तुझं स्वागत आहे ज्ञानेश्वर ! तुझ्या इतर मित्रांनाही समुहात सामील कर.
86477 या वर्षीच्या पुस्तक महोत्सवाला तुम्ही भेट दिलीत का?
पुस्तक महोत्सवात तुम्ही काय खरेदी केलीत?
86477 आज खुप दिवसांनी मराठी पुस्तक हातात घेतलं आणि तेही शांताबाईंचा कवितासंग्रह ! काही कविता मनावर गारुड करतात तर काही कायमचं "गोंदण"!

काही खास प्रयत्न न करता त्या कविता लक्षात राहतात, दहावीच्या पुस्तकातली "पैठणी" त्यापैकीच एक. अगदी प्रत्येक ओळ भावुक करणारी... असं म्हणतात माणुस भुतकाळात रमतो ते इथे फक्कड लागु होतं. आजीची पैठणी, तिचा मऊ, उबदार स्पर्श आणि अनंत आठवणी... हि कविता वाचल्यावर हमखास जाग्या होतात
माझ्यासारख्या आजोळी बालपण गेलेल्यांच्या बाबतीत तर ही कविता मनात हमखास रुंजी घालत राहते.

कधी काही गोष्टींना आपण गृहीत धरतो आणि कधी काही नात्यांना...
"देवपाट" अशीच एक जुनी गोष्ट... तसा फारसा विचार करायला न लागणारी पण त्यालाही शांताबाईंनी भावनांच्या धाग्यात गुंडाळलंय... "आजोबा" हि अजुन एक कविता, तिचा शेवट तर केवळ भन्नाट.. "मातीला ओढ मातीची... "

स्री भावना निसर्गाच्या वेगवेगळ्या रुपातुन प्रतिबिंबित करणाऱ्या तर बऱ्याच कविता आहेत... काहीत घुसमट, काहींमधे स्त्रीमनाचे सहज चित्रण निसर्गातल्याच एखाद्या साध्या घडामोडीतुन बेमालुम मिसळलंय

लहानपणीच्या आठवणींना उजाळा द्यायला आणि एका सिद्धहस्त कवयित्रींच्या कवितांचा आनंद लुटायला हे पुस्तक वाचलंच पाहिजे.. मनाच्या कोपऱ्यात असलेलं कडुगोड स्मृतींचं गोंदण एकदा निरखायलाच हवं…

फक्त "पैठणी" साठी ५ स्टार्स... तुम्हाला काय वाटतं?
86477 फेसबुकवर याच नावाने एक समुह तयार करण्यात आला आहे. GR वरील सर्व मराठी पुस्तक वाचकांना ह्या समुहात सामील व्हायला आवडेल का? फेसबुकवरील हा समुह सार्वजनिक असुन तो सर्वांसाठी खुला आहे.
86477 १३ डिसेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान पुणे पुस्तक महोत्सव पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात पार पडत आहे. ७५ हुन अधिक पुस्तकांचे स्टॉल्स असणाऱ्या या कार्यक्रमांत अनेक कलावंतांचे सादरीकरणही असणार आहे. सर्व पुस्तकप्रेमींनी याचा अवश्य लाभ घ्यावा हि विनंती !
86477 यादी बरीच मोठी आहे, धन्यवाद मित्रा या पोस्टसाठी 👍🏽
86477 मित्रहो, तुम्ही सगळे कसे आहात? वाचताय न? काल सहज ग्रंथालयात पुस्तक संग्रह चाळत असताना काही मराठी नाटकांची पुस्तकं पाहिली. त्यातली काही मी पुर्वीच वाचली होती, मनात आलं आपल्या समुहात विचारुन पहावं तुम्ही अशी नाटकं वाचली आहेत का?
86477 Hi @Pranav,
Please merge the author profile below-
https://www.goodreads.com/author/show...

to this-

https://www.goodreads.com/author/show...
86477 Hi @Pranav,
Pls help add book below-
Title- Shridhar Swami Maharaj Yanche Charitra
Author- Marutibua Ramdasi
Language- Marathi
Category- biography
Publication: Shri Samarth Seva Mandal Sajjangad
Pages: 338
Binding: paperback
86477 Hi @Pranav,
Pls help add book below-

Book name- Vincent van Gogh
Author- Madhuri Purandare
Publication- Purandare Prakashan
Category- Biography
ASIN ‏ : ‎ B078VN1MR9
Language- Marathi
Binding- Hardcover
Pages- 325

https://www.amazon.in/Vincent-van-Gog...
86477 Hi @Pranav
Pls help add below book-

Book Name- Jain Dharma Aani Tattva dnyaan
Author- Sindhu Dange
Publishers- Continental Prakashan
Binding- Paperback
Category- Philosophy
Pages- 275 pages
Language- Marathi
ASIN-‎ B01MRUC1Z9

https://www.amazon.in/Jain-Dharma-Tat...
« previous 1 3