ᴀмσℓ ᴋᴄ ࿇’s Comments (group member since Dec 27, 2025)
ᴀмσℓ ᴋᴄ ࿇’s
comments
from the मराठीवाचकमित्र group.
Showing 1-4 of 4
Hi @Pranav @ShubhangiPls add this book
*Title : भटकंती
*Author : हेरमन हेसे
*Translated By : रेणूप्रसाद पत्की
*Publication : वॉल्डन पब्लिकेशन
* 6th deluxe edition
*Hardcover: 160 pages
*ISBN :978-81-998467-6-0
https://amzn.in/d/0107attZ
हेरमान हेसेच्या 'भटकंती' (मूळ जर्मन : Wanderung) या पुस्तकात त्याने इटलीच्या उत्तर भागात केलेल्या भटकंतीची वर्णनं येतात. निसर्ग आणि काही प्रमाणात दैनंदिन मानवी जीवनातील घटकांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या या वर्णनांना मुक्तचिंतनाचे स्वरूप प्राप्त होते. निसर्गदर्शनातून आत्मदर्शन हा या भटकंतीचा मूळ उद्देश आणि म्हणूनच या लेखांचे मुख्य सूत्र आहे, असं म्हणता येईल. हेसेला अपेक्षित असणारी भटकंती ही त्यामुळे तथाकथित अर्थाने भटकंती नाही, तसंच त्याला अपेक्षित असणारा भटक्या देखील तथाकथित भटक्यांपेक्षा वेगळा आहे. तो स्वतःच्या आणि जीवनार्थाच्या शोधात आहे. तो जीवनोत्सुक आहे, जीवनाच्या मूळ प्रक्रियेत त्याला रस आहे. आणि तो निसर्गनिरीक्षण आणि आत्मनिरीक्षण यांत भेद करत नाही. निसर्गाकडे परत जाण्याचा रस्ता हाच त्याच्यासाठी स्वतःपर्यंत पोहोचण्याचा रस्ता आहे. हेसेच्या या पुस्तकातील लेख वाचकाला निसर्गाची आणि निसर्गाच्या आपल्या आयुष्यातील स्थानाची नव्याने ओळख करून देतील आणि अंतर्मुख करतील.
Hi @Pranav @ShubhangiPls add this book
* Title : चिरंतनाचा गंध
* Author : विलास सारंग
* Publications : शब्द प्रकाशन
* Paperback: 119 pages
* ISBN : 978-81-969778-7-0
https://amzn.in/d/06nuAVUj
'सोलेदाद' आणि 'आतंक' या दोन संग्रहांनंतरचा 'चिरंतनाचा गंध' हा विलास सारंग यांचा मराठीतील तिसरा कथासंग्रह. वर्तमानातील एकाकीपणा, आत्मदुरावा, असंगतता, व्यक्तीच्या मनातील अनाकलनीय काळोख, या सर्व गोष्टींचा वेध घेणारी सारंगांची कथा 'चिरंतनाचा गंध' मध्ये समूहापर्यंत पोहोचली आहे. अगोदरच्या खास आधुनिकवादी आशयसूत्रांमधील ताणतणाव या संग्रहातील कथांनी टिकवून ठेवले आहेतच; त्यांच्या बरोबरीने सारंगांच्या कथेमध्ये आता भूतकाळाला आणि सांस्कृतिक अर्थनिर्णयनाला कळीचे महत्त्व येऊ लागले आहे.
'चिरंतनाचा गंध' मधील कथांमध्ये आदिम मिथ्यकथा आणि वर्तमान परिस्थिती यांचे अद्भुत मिश्रण आहे. अस्तित्वाच्या कडेलोटापर्यंत येऊन पोहोचलेल्या नैतिकतेचा कस पाहाणाऱ्या घटना आहेत. वास्तवापासून अतिवास्तवापर्यंतचे भव्य परिप्रेक्ष्य आहे. या सर्व घटकांना वेढून असणारी सारंगांची विलक्षण तीव्र, अंतर्भेदी अशी कल्पनाशक्तीही आहे.
'चिरंतनाचा गंध' यामुळेच लक्षणीय ठरतो. मराठी कथेला वेगळी परिमाणे देण्याची क्षमता या कथांमधून खात्रीने प्रत्ययाला येते.
Hi @Pranav @ShubhangiPls add this book
* The Library | द लायब्ररी
by Zoran Zivkovic (Author), Trans. Nitin Rindhe (Author)
Publisher : Walden Publication (31 October 2024)
Perfect Paperback : 132 pages
ISBN-10 : 8197019975
ISBN-13 : 978-8197019975
द लायब्ररी' या पुस्तकातल्या सर्व कथा पुस्तक या वस्तूभोवती फिरत असल्या तरी, शेवटच्या कथेचा नायक म्हणतो त्याप्रमाणे यातल्या प्रत्येक कथेची चव वेगळी आहे. या कथांमधली पात्रं पुस्तकं जमवणारी, वाचणारी, लिहिणारी आहेत. पण सर्व कथांचा खरा नायक आहे पुस्तक. पुस्तकंच या मानवी पात्रांवर वर्चस्व गाजवतात; त्यांच्या आयुष्यात प्रश्न निर्माण करतात. दैनंदिन सर्वसामान्य तर्कबद्ध जीवनातल्या पुस्तक नावाच्या वस्तूला झिवकोविच तर्कापलीकडच्या अद्भुत जगात नेतो. या जगात पुस्तकांना चव असते आणि लेखकांच्या शरीराला वेदनेचा गंध असतो; पुस्तक माणसाच्या अस्तित्वावर अतिक्रमण करतात किंवा मिटली की नाहीशी होतात. पुस्तक टिकवण्यासाठी कथानायकाला या अत्याधुनिक काळातही हस्तलिखित परंपरेकडे वळावं लागणं, किंवा जिवंतपणे मुळीच वाचन न करणाऱ्यांना नरकात 'वाचना'ची शिक्षा ठरवली जाणं- लेखकाने सध्याच्या समाजात पुस्तकाविषयी असलेल्या (अ)संवेदनशीलतेवर सूचक भाष्य केला आहे. या कथा सांगतात त्याहून सुचवतात कितीतरी अधिक. खेळकर आणि गंभीर, काव्यात्म आणि उपासात्मक अशा वैविध्यपूर्ण अनुभवांतून हे सुचवणं असतं...
https://amzn.in/d/itkj0E4
नमस्कार,मी अमोल चौधरी.पुणे येथे वास्तव्यास आहे.मला मराठी, हिंदी व इंग्रजी साहित्य वाचण्याची आवड आहे.यांत्रिक अभियंता म्हणून कॉर्पोरेट मध्ये कार्यरत आहे,कामाच्या वेळेनंतर मी शक्य तितका वेळ नियमित वाचनासाठी देतो.
