“कुंवरजी, हजारो काळे फत्तर जेव्हा स्वत:ला पायात गाडून घेतात, तेव्हाच त्यांवर असं संगमरवरी स्वप्न उभं राहतं, आपल्या सौंदर्यात झगमगतं. जोवर ही इमारत आहे, तोवर आमच्यासारखे अनेक मुसाफीर इथं येतील, याचं सौंदर्य पाहून थक्क होतील, तृप्त होतील; पण या शिल्पाच्या उभारणीसाठी याच्या पायात खर्ची पडलेल्या हजारो फत्तरांचा हिशेब कुणाच्या ध्यानीमनीही येणार नाही. आम्हीही एक स्वप्न उभं करीत आहोत. जगदंबेच्या कृपेनं ते आज ना उद्या साकार होईलही. ते जेव्हा घडेल, तेव्हा त्याचं कर्तृत्व आमच्या माथी मारलं जाईल; पण ज्यांच्या शहादतीवर स्वराज्य उभं राहिलं, आमच्या शब्दाखातर ज्यांनी स्वराज्याच्या पायी कुर्बानी केली, त्या सर्वांची नावनिशाणी कोण सांगणार? आज ताज पाहत असताना आम्हांला आमच्या मोहिमांत कामी आलेल्यांची तीव्रतेनं आठवण होत आहे.’ राजे भानावर आले. ‘...चला, कुंवरजी! ताज पाहू.”
―
रणजित देसाई,
श्रीमान योगी