Deepak Dudhate > Deepak's Quotes

Showing 1-2 of 2
sort by

  • #1
    “गरीब माणसं कामचुकार असतात, आळशी असतात, दारू पितात म्हणून ती गरीब असतात याही युक्तिवादाला काहीच अर्थ नव्हता हे पटलं होतं. ते गरीब आणि बेकार असल्यामुळे व्यसनी होतात; ज्यातून आनंद मिळेल, नवीन शिकायला मिळेल, ज्यातून परिपूर्ण झाल्यासारखी म्हणजे सेल्फ़ ॲक्च्युलायजेशनची भावना निर्माण होईल असं काम नसल्यामुळे आणि शिवाय केलेल्या कामाचा मोबदला न मिळाल्यानं आणि कामाचा संपूर्ण उत्पादनव्यवस्थेशी संबंध न कळल्यानं जे एलियनेशन येतं, त्यामुळे त्यांचं कामात लक्ष लागत नाहीआणि मग आपण त्यांना आळशी म्हणतो हे समजलं होतं. जर कामात नाविन्य असेल, तर काही शिकल्याचा आनंद आणि नवनिर्मितीची सर्जनशीलता असेल, तर ते हे काम, काम न वाटता आनंददायी गोष्ट वाटेल आणि ते करण्यासाठी लोक वाट बघतील; त्यांचा आळस कुठल्या कुठे पळून जाईल हेही जाणवत होतं. थोडक्यात कामाच्या स्वरूपात त्यांच्या आळशीपणाची कारणं दडली होती. घरगडयापासून ते शेतमजूरापर्यंत किंवा कामगारापर्यंत जेव्हा त्यांना आळशी म्हणण्यात येतं तेव्हा मी ते तसं म्हणणा-याला एकच प्रश्न स्वतःला विचारायला लावतो.. तो म्हणजे तसचं काम अनेक महिने , वर्षं तुम्हाला करायला सांगितला तर तुम्ही स्वतः ते न कंटाळता, उत्साहानं कराल का? आणि तसं काम वर्षांनुवर्षं करायला तुम्ही कंटाळा केलात आणि जर तुम्हाला कोणी आळशी आणि कामचुकार म्हटलं तर चालेल का?”
    Achyut Godbole, मुसाफिर [Musafir]

  • #2
    “त्या काळी रशिया अमेरिकेपेक्षा खूपचं मागासलेला आहेयाविषयी प्रचंड प्रचार आणि भडिमार होत असे. पण रशियानं सुरवातचं मुळी अमेरिकेपेक्षा प्रचंड मागासलेल्या अवस्थेत केली होतीहे त्यात विसरलं जात होतं. खरं तर अमेरिका आणि रशिया यांची तुलना करणंच हास्यास्पद होतं. तुलना करायचीच झाली तर क्रांतीपूर्वीचा, 1917 सालाच्या अगोदरचा आणि नंतरचा रशिया अशी करायला पाहिजे होती. पण ती सोयिस्कररित्या केली जात नव्हती. रशियामध्ये रेशनच्या दुकानासमोर मोठी रांग असते अशी रशियाची खिल्ली उडवली जायची. पण हे सांगितलं जायचं नाहीकी या रांगेत उभं राहून थोड्या वेळाने का होईना लोकांना खायला मिळतंय, जे पूर्वी कित्येकांना मिळतचं नसे. रशियामध्ये मोठे श्रीमंत नसतील पण निदान आता रस्तोरस्ती बेकार व भिकारी तरी दिसत नव्हते. आरोग्य आणि शिक्षण या दोन क्षेत्रांत रशियानं प्रचंडच प्रगती केली होती. आणि संपूर्ण पाश्चिमात्त्य भांडवली जगानं रशियाला एकटं पाडून, वाळीत टाकून, त्यांच्याविरूद्ध एम्बार्गो करून, अनेक वेळेला आक्रमणं करून प्रचाराचा आणि ब्रेन वॉशिंगचा प्रचंड भडिमार करूनही रशिया तग धरून होता हेचं नवल होतं...”
    Achyut Godbole, मुसाफिर [Musafir]



Rss