Rahul > Rahul's Quotes

Showing 1-3 of 3
sort by

  • #1
    Shivaji Sawant
    “श्रद्धा म्हणजे काटेरी जीवनावरची हिरवळ! स्वत:वरच श्रद्धा हवी. ज्याची स्वत:वर – स्वत:च्या दिव्य स्वरूपावर श्रद्धा नाही तो जगासाठी, इतरांसाठी काहीच करू शकत नाही.”
    Shivaji Sawant, मृत्युंजय

  • #2
    Shivaji Sawant
    “निद्रा ही सर्वांत अधिक उदारहृदयी माता आहे! व्यक्तिव्यक्तींची विभिन्न दु:खं ती एकाच ममतेनं काही काल का होईना; पण निश्चितच आपल्या विशाल उदरात घेते!”
    Shivaji Sawant, मृत्युंजय

  • #3
    Shivaji Sawant
    “पण ज्याला जग दुर्गुण म्हणतं तो दुर्गुण म्हणजे तरी काय? कुणालातरी ते निश्चितपणानं सांगता येईल काय? कारण मला माहीत आहे, दुबळ्या मनाच्या कर्तृत्वशून्य माणसांनी निर्माण केलेल्या ह्या सर्व खोट्या आणि खुळ्या कल्पना आहेत. कारण ज्या कृतीला जग एकदा सद्‌गुण म्हणतं, त्याच कृतीला दुसऱ्या वेळी ते दुर्गुण म्हणतं आणि ते बरोबरही असतं. उदाहरण द्यायचं झालं, तर मानवाच्या हत्येचं देता येईल. एखादा ज्वलंत देशप्रेमी माणूस आपल्या राज्यातील एखाद्या घरभेद्याला ठार मारतो. जग अशा मारणाऱ्याला राष्ट्रभक्त म्हणून ओळखतं. त्याच्या नावाचा गगनभेदी जयजयकार करतं, पण एखादा लुटारू धनाच्या लोभानं एखाद्या वाटसरूच्या डोक्यात परशू घालतो. जग त्याला हत्यारा म्हणतं. कृती एकाच प्रकारची असते. एका माणसाकडून दुसऱ्या माणसाच्या हत्येची, पण जग एका मारेकऱ्याला राष्ट्रभक्त म्हणतं, तर दुसऱ्याला वधिक म्हणतं.”
    Shivaji Sawant, मृत्युंजय



Rss